Tarun Bharat

फोंडा नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी यांचा राजीनामा

पुढील नगराध्यक्ष म्हणून रितेश नाईकचे नाव चर्चेत

प्रतिनिधी / फोंडा

फोंडा पालिकेचे युवा नगराध्यक्ष विश्वनाथ उर्फ अपूर्व दळवी यांनी काल बुधवारी पालिका प्रशासकांना राजीनामा सादर केला. भाजपा पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार राजीनामा सादर केल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आठ महिने कार्यभार हाताळला. नाटय़मळ घडामोडीत आमदार रवी नाईक यांच्या दोन्ही पुत्रांनी भाजपा प्रवेश केल्यानंतर दळवी यांनी नगराध्यपदाची सूत्रे हाती घेतली होती. अजून फोंडा पालिकेचा कार्यकाळ संपण्यास सुमारे दीड-दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे, त्यामुळे पुढील नगरसेवक कोण? ही चर्चा फोंडय़ात रंगली आहे.

 27 ऑगस्ट 2020 रोजी विश्वनाथ दळवी यांनी फोंडा पालिकेच्या नगराध्यपदी वर्णी लागली होती. व्यंकटेश उर्फ दादा नाईक यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. नेमक्या याच वेळी फेंडय़ाचे आमदार रवी नाईक यांच्या दोघा पुत्रांनी (नगरसेवक रितेश व त्याचे बंधू रॉय) यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी नगराध्यक्षपदासाठी सुरुवातीला रितेश नाईक यांची वर्णी लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. अनपेक्षितरीत्या त्यावेळी विश्वनाथ दळवी यांची फोंडा पालिकेवर अध्यक्षपदी आरुढ झाले होते. त्यांच्याजवळ  8 भाजपा नगरसेवकांचे बळ होते व अन्य 7 जणांचा पाठिंबा लाभला होता.  आपल्यासाठी पक्षश्रेष्ठीचा निर्णय अंतिम असून भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या निर्णयानुसार राजीनामा देण्यात आल्याची माहिती विश्वनाथ दळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. नगराध्यक्षपदाची माळ रितेश नाईक यांच्या गळय़ात पडण्याची शक्यता यावर बोलताना त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले असून त्यावर पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेणार असल्याचे त्यांने संकेत दिले.

Related Stories

कारापूर सर्वणच्या प्रभाग 2 साठी एकूण 5 अर्ज दाखल

Amit Kulkarni

राज्यात सर्वत्र विक्रमी पाऊस

Amit Kulkarni

मांगोरहिलमध्ये वाढते रुग्ण… वाढती अस्वस्थता !

Omkar B

काणकोणच्या भाजप उमेदवारीसाठी प्रमुख कार्यकर्त्यांकडून मतदान

Amit Kulkarni

बेकायदा गाडय़ावर कारवाईकडे मडगाव नगरपालिकेचे दुर्लक्ष

Patil_p

पुढील 60 दिवस फार काळजीचे

Omkar B