Tarun Bharat

फोंडा येथील केशव देव समितीतर्फे 2 एप्रिलपासून ‘श्री राम कथा’

गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत रोज 5.30 पासून आयोजन

प्रतिनिधी /फोंडा

पंडितवाडा-फोंडा येथील श्री केशव देव सेवा समिती, श्री ब्रह्मचैतन्य उपासना केंद्र फोंडा, सायुज्य सांस्कृतिक संघ बोरी यांच्या संयुक्त विद्यमाने मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम यांची जीवनगाथा ‘श्री राम कथा’ ह.भ.प. कीर्तनचंद्र शेयस मिलेंद बडवे पुणे यांच्या अमृतवाणीतून शनिवार 2 एप्रिल ते रविवार 10 एप्रिल पर्यंत केशव मंदिरात रोज सायं. 5.30 ते 8.30 दरम्यान कीर्तनरूपात सादर करण्यात येणार असल्याची माहिती केशव देव सेवा समितीचे उपाध्यक्ष संजय घाटे यांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

  यावेळी पदाधिकारी रामशंकर, संतोष पुजारी, वल्लभ बोरकर, मनोज केणी उपस्थित होते. शुक्रवार 1 एप्रिलपासून गुढीपाढव्याल उत्सवाला सुरूवात होणार असून 9 एप्रिल  रामनवमी दिवशी सामारोप होणार आहे. त्यानिमित्त शुक्रवार 1 एप्रिल रोजी सायं. 5.30 वा. श्री राममुर्तीची हनुमान मंदिर कवळे येथून दिंडी पथकासह शोभयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर दररोज सकाळी 9 वा. श्री ब्रह्मचैतन्य उपासना केंद्र फोंडातर्फे श्री रामचरितमानस ग्रंथ वाचन, दुपारी 12.30 वा. महापूजा, महाआरती, सायं. 5.30 वा. श्री राम कथा, रात्री 9 वा. आरती प्रसाद होईल. भाविकांनी उपस्थित राहून किर्तन व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन केशवदेव सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे.

    श्री राम कथेत-बाल कान्ड ते रामराज्यभिषेक

 पहिल्या दिवशी शनिवारी बाल कान्ड-लवकुश श्रीराम भेट, दुसऱया दिवशी 3 एप्रिल रोजी अयोध्या कान्डöश्री राम जन्मोत्सव, 4 एप्रिल रोजी अरण्य कान्ड-ताटीका वध आणि सीता स्वयंवर, 5 एप्रिल रोजी किष्किन्धा कांन्ड-श्रीराम वनवास, 5 एप्रिल रोजी सुंदर कान्ड-गंगा पार व चित्रकुट निवास, 7 एप्रिल रोजी सुंदर कान्ड-राम भरत भेट,  8 एप्रिल रोजी युद्ध कान्ड-सीता अपहरण व शबरी हनुमंत भेट, 9 एप्रिल रोजी युद्ध कान्ड-सीता शोध व लंका दहन, समारोपाच्या 9 एप्रिल रोजी रामायणामृत-रावण वध व रामराज्याभिषेक या विषयावर पुणे येथील कीर्तनकार बडवे यांचे कितर्न होईल. त्याना संवादिनीवर मुंबई येथील स्वप्निल परांजपे व तबल्यावर रूद्राक्ष वझे साथसंगत करतील.

Related Stories

सुर्ला ग्रामपंचायत मुख्यमंत्र्यांमुळे प्रगतीच्या दिशेने

Amit Kulkarni

विजय सरदेसाई यांची सर्व प्रकरणे बाहेर काढणार – आमदार सोपटे

GAURESH SATTARKAR

मृत्यूच्या थैमानाने राज्यात अस्वस्थता

Patil_p

मोफत पाणी, वीज दरवाढ न करण्याची घोषणा ही ‘स्टंटबाजी’

Omkar B

गोवा स्वच्छ ठेवण्यासाठी पुढे येऊया

Amit Kulkarni

सत्तरीत आंबा, काजू बहरले; अच्छे दिन येणार ?

Amit Kulkarni