Tarun Bharat

फोंडा येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी संशयिताला चार दिवसाची पोलीस कोठडी

संशयिताने लपविलेले रक्तांनी माखलेले कपडे पोलिसांकडून जप्त

प्रतिनिधी /फोंडा

फोंडा शहरात दिवसाढवळय़ा दोघा बहिणीचा निर्घृणरित्या खून करून पसार झालेल्या प्रुरकर्म्याला फोंडा पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक करीत महत्वपुर्ण कामगिरी बजावली. संशयित महादेव दुर्गा घाडी (34,) याला बाये-सुर्ला येथून अटक केली आहे. संशयिताने घटनेनंतर झाडाझुडूपात लपवून ठेवलेले रक्ताने माखलेले कपडे पाळी व सुर्ला येथून फोंडा पोलिसांनी जप्त केले आहे.

सुपरमार्केट-फोंडा येथील कामत रेसिडेन्सीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटात दोघा बहिणीचा धारदार शस्त्राने निघृण हत्या केल्याचा खळबजनक प्रकार शनिवार 16 रोजी दुपारी उघडकीस आला होता. मंगला तुळशीदास कामत (75) व जीवन क्यंकटेश कामत (65 निवृत्त नर्स) अशी दोन्ही मृत बहिणींना संशयिताने किचनमध्ये खून केला होता. सदर घटना 11 वा. सुमारास घडली होती. निवृत्त नर्स मयत जीवन व्यंकटेश कामत हिने संशयित महादेव याला दोन लाख रूपये उसने दिले होते. ते व्याजासह सुमारे 2 लाख 65 हजार रूपये इतके झाले होते. तिने ते परत देण्यासाठी तगादा लावण्यामुळेच दोघा सख्क्य़ा बहीणीचा खूनाचा प्रकार घडल्याची कबूलीही संशयिताने पोलीस तपासाअंती दिली आहे.

 रक्ताने माखलेले कपडे पाळी व सुर्ला येथून जप्त    

संशयिताने उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी मयत जीवन कामत वारंवार  फोन करीत होती. परंतू यावेळी तिने सदर बाब वेर्णा येथील कंपनीच्या उच्चधिकाऱयासमोर उलगडा करण्याचा ईशाराही संशयिताला दिला होता. त्यामुळे तो अस्वस्थ झाला होतो. त्यामुळेच तो तडकाफडकी मयत जीवन कामत यांना आपली बाजू समजून सांगण्यासाठी दुचाकी पल्सर जीए 08 पी 5546 ने सुमपरमार्केट येथील कामत यांच्या फ्लॅटवर शनिवारी दाखल झाला होता. त्यानंतर हा खूनाचा प्रकार घडला होता. फ्लॅटवर येताना संशयिताने टिशर्ट व फुल पेंट परिधान करून आला होता. मात्र घटनास्थळावर हत्याकांडात त्याची पेंट रक्ताने माखली होती. टीशर्ट रक्ताच्या मिळत्याजुळत्या रंगाचे असल्याने रक्ताचे डाग दिसत नव्हते. त्यामुळे टीशर्ट तसेच अंगावर ठेवले व फूल पेंट गुडांळून घेतली, आपल्या पल्सर दुचाकीने आतील हाफ पेंटनेच तो सुर्ला येथे पोचला. वाटेत पाळी येथे त्याने रक्ताने माखलेली पेंट झाडाझुडपात लपवून ठेवली होती. फोंडा पोलिसांनी ती काल सोमवारी जप्त केली तसेच रक्ताचे डाग असलेले टीशर्ट त्याच्या घरातूत हस्तगत केले आहे. दरम्यान संशयिताला बुधवार 20 रोजीपर्यत चार दिवसाच्या रिमांडवर पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. 

Related Stories

नौदल ध्वजाधिकाऱयांनी घेतली राज्यपालांची भेट

Amit Kulkarni

केपे बाजार प्रकल्पाचे अपुर्णावस्थेतच उद्घाटन

Patil_p

सत्ता मिळाल्यास स्वस्त दरात पेट्रोल

Amit Kulkarni

परीक्षांवरुन विद्यार्थी, पालक, बोर्ड, सरकार यांच्यात संघर्ष सुरुच

Amit Kulkarni

राजकरणातून हद्दपार करण्यासाठी एकवटलेल्या विरोधकांना जबरदस्त चपराक- गोविंद गावडे

Amit Kulkarni

कुंभारजुवे आदर्श मतदारसंघ बनविण्याचे ध्येय!

Amit Kulkarni