Tarun Bharat

फोंड्यातील आर्विन सुवारीस आणि नारायण नाईक यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Advertisements

प्रतिनिधी / पणजी

फोंडा पालकिचे माजी नगरसेवक आर्विन सुवारीस आणि कुर्टी पंचायतीचे माजी पंच सदस्य नारायण नाईक यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ निरीक्षक पी. चिदंबरम, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, फोंड्याचे उमेदवार राजेश वेरेकर, फोंडा गटाध्यक्ष जॉन पॅरेरा, ट्रिबोलो सौझा आदी उपस्थित होते.

राजेश वेरेकर म्हणाले की, आर्विन सुवारीस यांच्याकडे काँग्रेसच्या माजी नेतृत्वाने दुर्लक्ष केले आणि त्यामुळे ते इतर पक्षांसोबत राहिले. ‘‘आर्विन सुवारीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. पण आज ते आमच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता पुढे नेण्यासाठी आणि पक्ष वाढण्यास मदत करण्यासाठी पुन्हा काँग्रेसमध्ये आले आहेत.” असे वेरेकर म्हणाले.आर्विन सुवारीस म्हणाले की पी चिदंबरम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने त्यांना खुप बरे वाटले. ‘आज मला माझा सन्मान झाल्या सारखे वाटले कारण मला पी चिदंबरम यांचे नेतृत्व नेहमीच आवडले. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मी प्रवेश केला आहे.” असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना गिरीश चोडणकर म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच गोव्यातील जातीय सलोख्याचे रक्षण केले असून यापुढेही सर्व समाजाचे रक्षण करणार आहे. “आम्ही इतर मतदारसंघासह फोंड्यातील जागाही जिंकणार आणि स्थिर सरकार स्थापन करणार.” असे चोडणकर म्हणाले.

Related Stories

हे भगवंताशी एकरूप होण्यासारखे : उषा सरदेसाई

Amit Kulkarni

दुबईहून 155 हवाई प्रवासी दाखल

Omkar B

पणशीवाडा पेडणे येथे घर कोसळले

Amit Kulkarni

गोव्यातही मंदिर पुर्ननिर्माणासाठी न्यायालयीन लढा उभारणार

Amit Kulkarni

जिल्हय़ात सर्वत्र शुकशुकाट

NIKHIL_N

आंगणेवाडी यात्रा प्रथमच साध्या पद्धतीने

NIKHIL_N
error: Content is protected !!