Tarun Bharat

फोंडय़ातील बुधवारपेठ पूर्ण लॉकडाऊन

Advertisements

शनिवारच्या आठवडा बाजारात शुकशुकाट

प्रतिनिधी/ फोंडा

लॉकडाऊनला दुसऱया दिवशी शनिवारी फोंडय़ात संमिश्र प्रतिसाद लाभला. लॉकडाऊनमधून वगळण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा, किराणा दुकाने व इतर व्यवहार कमी अधिक प्रमाणात सुरु होते. फोंडा पालिकेने शनिवारचा आठवडा बाजार बंद ठेवण्याची घोषणा केल्याने त्याला बुधवारपेठेतील सर्व व्यापाऱयांनी सहकार्य करीत सर्व व्यावहार बंद ठेवले.

बुधवारपेठेतील भाजी मार्केट, मासळी बाजार व इतर सर्व व्यवहार पूर्ण दिवस बंद होते. मासळी बाजारातील काही विक्रेत्यांनी सकाळी मासे विकण्याचा खटाटोप केला. मात्र पोलीस व पालिका कर्मचारी बाजारात दाखल होताच त्यांनी आपल्या टोपल्या गुंडाळून ठेवल्या. मासळी बाजाराची दोन्ही प्रवेशद्वारे नंतर अडथळे उभारुन बंद करण्यात आली. भाजी व फुलबाजार पूर्णपणे बंद राहिला. शनिवार हा फोंडय़ातील आठवडय़ाचा बाजार असल्याने तालुक्यातील आसपासच्या भागातून काही शेतकरी व बागायतदार आंबे व इतर बागायती साहित्य विक्रीसाठी घेऊन आले होते. त्यांनाही पालिका कर्मचाऱयांनी माघारी पाठविले. मासळी बाजारातील चिकन व मांस विक्रेत्यांनीही दुकाने बंद ठेवली होती. फोंडय़ातील खरेदी विक्रीचे महत्त्वाचे केंद्र असलेला बागायतदार बाजार व त्यांची अन्य खरेदी विक्री केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत.

बुधवारपेठ सोडल्यास शहरातील इतर भागात काही ठिकाणी भाजी, अंडी व चिकन विक्रेत्यांनी आपली दुकाने खुली ठेवली होती. मुख्य़ बाजारपेठ व आठवडा बाजार बंद राहिल्याने काही मासे विक्रेते वाहनातून फिरत मासे विकताना दिसत होते. सध्या आंब्याचा हंगाम असल्याने बऱयाच विक्रेत्यांनी शहरातील विविध नाक्यांवर थांबून आंब्यांची विक्री केली. शहरातील एक दोन बार रेस्टॉरंट सोडल्यास बहुतांश आस्थापने बंद होती.

शनिवारी 1 मे म्हणजेच कामगार दिन असल्याने तालुक्यातील औद्योगिक आस्थापने बंद राहिली. अत्यावश्यक सेवामध्ये येणाऱया कर्मचाऱयांची वाहतूक करणारी वाहने तसेच काही प्रमाणात कदंब बसेस उपलब्ध होत्या. एरवी गजबजाणारे फोंडा शहर गेल्या दोन दिवसांपासून तसे सामसूम आहे. वाहतुकही तुरळक प्रमाणात सुरु आहे.

Related Stories

अ.भा. सनशाईन क्रिकेटमध्ये रायगडचा सार्थक, डोंबिवलीचा दादा प्रतिष्ठान उपान्त्य फेरीत

Amit Kulkarni

गोवा आंतरराष्ट्रीय कायदा विद्यापीठाचे आज उद्घाटन

Amit Kulkarni

आमदार रवी नाईक यांच्यातर्फे राजीव गांधी जयंती

Amit Kulkarni

शिरोडय़ात 22 रोजी ‘व्यंकोजी वाघ’ नाटय़प्रयोग

Amit Kulkarni

खाणी सुरु होण्याच्या आशा पल्लवित

Amit Kulkarni

पत्रकाराला मारहाणप्रकरणी दोघे आरोपी दोषी

Patil_p
error: Content is protected !!