Tarun Bharat

फोंडय़ात अवैद दारु विक्रीवर 2 दिवसांत दुसरा छापा

पाऊणवाडा कवळे येथून 25 हजारांची दारु जप्त : फोंडा पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी /फोंडा

पाऊणवाडा-कवळे येथील ईश्वर जनरल स्टोअर या भुसारी दुकानवजा चहाच्या हॉटेलवर फोंडा पोलिसांनी छापा टाकून रु. 25 हजारांच्या किंमतीची बेकायदेशीर दारु जप्त केली. काल मंगळवारी दुपारी ही धडक कारवाई करण्यात आली. गेल्या दोन दिवसांत बेकायदेशीर दारु विक्रीवर फोंडा पोलिसांनी केलेली ही दुसरी कारवाई आहे.

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाऊणवाडा येथील या दुकानात अवैद दारुची विक्री होत असल्याच्या वाढत्या तक्रारी होत्या. फोंडा पोलिसांच्या पथकाने त्याबाबत खात्री करुन घेत, मंगळवारी अचानकपणे हा छापा टाकला. या कारवाईत मॅकडोवेल, रॉयल चॅलेंज, इंपेरियल ब्ल्यू या विस्कीबरोबरच रोमानोव्ह व्होडका, बियरचे खोके असा 77 हजार लिटरचा दारुचा साठा जप्त करण्यात आला. दुकानाचे मालक महेश नाईक यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी फोंडा अबकारी खात्याकडे सोपविण्यात आले. दोन दिवसांपूर्वी फोंडा पोलिसांनी कुंडई औद्योगिक वसाहत परिसरातील एका रॅस्टोरंटवर छापा टाकून रु. 45 हजारांचा दारुचा अवैद साठा जप्त केला होता. उपनिरीक्षक परेश सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक उपनिरीक्षक निलेश भामईकर व अन्य पोलीस पथकाने ही कारवाई केली.

फोंडा तालुक्यातील विविध भागात चहाची हॉटेल्स व अन्य दुकानाआड अवैद दारुची विक्री सर्रासपणे चालल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. बार मालकांनी रितसर परवाने घ्यायचे, कर भरायचा आणि अशा अवैद दारु विक्रेत्यांनी त्यांच्या व्यावसायाआड कमाई करायची याबद्दल मोठय़ा प्रमाणात तक्रारी आहेत.

Related Stories

मांगोरहिलमध्ये सेवा बजावणाऱयांना कोरोना

Omkar B

कारवारला कोकणी – कन्नड वाद उफाळला

Amit Kulkarni

राजधानी ठरतेय कोरोना हॉटस्पॉट

Patil_p

श्रीरामराज्यासाठी ‘भारत’ नावाचा जयजयकार करा

Patil_p

‘शॅडो कौन्सिल’ने नगराध्यक्षांना करून दिली सूचनांची आठवण

Amit Kulkarni

रविवारी तब्बल 64 नवे कोरोना रुग्ण

Omkar B