Tarun Bharat

‘फोटोग्राफर बाबा’ म्हणून ओळखले जाणारे स्वामी सुंदरानंद यांचे देहावसान

नाशिक / प्रतिनिधी :


हिमालयातील क्षेत्रात ‘फोटोग्राफर बाबा’ म्हणून ओळखले जाणारे संन्यासी स्वामी सुंदरानंद (97) यांचे देहावसान झाले आहे. आपल्या कॅमेराने टिपलेल्या लक्षावधी छायाचित्रांच्या माध्यमातून सुमारे 70 वर्षातील हिमालयाच्या स्थित्यंतराचा आलेख जगभर पोहोचविणारे स्वामीजी हे “हिमालयाचा संदर्भ कोश” म्हणून ओळखले जात. तसेच देशविदेशात त्यांचा मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग आहे.


मूळचे आंध्रप्रदेशातील अनंतपूरचे रहिवासी असलेले स्वामीजी वयाच्या 13 व्या वर्षी हिमालयात आले. त्यांनी वेदान्ताचे महान भाष्यकार स्वामी तपोवन महाराज यांचे शिष्यत्व स्वीकारले आणि आजीवन त्यांची सेवा केली. गुरुंच्याच प्रेरणेने  गंगोत्रीत राहून 1947 पासून  साधना, हिमालय भ्रमण आणि हिमालयाच्या पर्यावरण रक्षण अभियानाला प्रारंभ केला. गिर्यारोहणाचे अनेक विक्रम प्रस्थापित करीत असताना सत्तर वर्षात सुमारे दोन लाखांवर छायाचित्र टिपली. त्यावर आधारित “हिमालय : थ्रू द लेन्स ऑफ अ साधू” या ग्रंथाचे प्रकाशन दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांनी केले होते. उत्तर काशीतील प्रसिद्ध “नेहरू पर्वतारोहण संस्थेचे” ते अनेक वर्षे मानद संचालक होते. एव्हरेस्ट वीर तेनसिंग यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. एव्हरेस्ट कन्या  बचिंद्री पाल, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी पर्वतारोहणाचे आणि योगासनांचे धडे स्वामीजींकडून घेतले. 1962 च्या  भारत – चीन युध्दात  त्यांनी लष्कराला हिमालयाला  अज्ञात रस्ते दाखवून  मार्गदर्शन केले होते. त्यांच्या या कार्याचा बहुमान म्हणून हिमालयातीय एका मार्गाला त्यांचे नाव देण्याला आले.


शिवाय गंगोत्रीच्यावर असलेल्या एका ग्लेशियरला  “सुंदर ग्लेशियर” आणि एका शिखराला “सुंदर शिखर” म्हणून ओळखले जाते. राष्ट्रपती भवन, संसद भवन, विविध विधान भवने यापासून देशातील प्रमुख शहरात त्यांनी  स्लाईड शो चे शेकडो कार्यक्रम केले आणि जनसामान्यांना हिमालयाचा परिचय करून दिला. देशातील प्रमुख मासिकात आणि वर्तमानपत्रातून त्यांनी विपूल लेखन केले. डिस्कवरी चैनल, जपान ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनने त्यांच्यावर माहितीपट तयार केले आहेत.

Related Stories

पुणे : मृत्युदर शुन्यावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे : जिल्हाधिकारी

Tousif Mujawar

सातारच्या उपनगराध्यक्षपदी मनोज शेंडे

Patil_p

अकरावी प्रवेशाबाबत पुन्हा अचानक तपासणी

Patil_p

महापालिका कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

Archana Banage

मराठा तरुणांच्या प्रश्नी प्रतीक यांचे अजित पवार यांना साकडे

Archana Banage

पुणे विभागातील 4 लाख 30 हजार 556 रुग्ण कोरोनामुक्त

Tousif Mujawar