Tarun Bharat

फोर्ट परिसरातील भानुशाली इमारतीचा भाग कोसळला

ऑनलाईन टीम / मुंबई : 


मुंबई सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. त्यातच आता फोर्ट परिसरातील भानुशाली इमारतीचा भाग कोसळला असल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या असून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही इमारत शंभर वर्ष जुनी होती. ही पाच मजल्यांची इमारत असून इमारतीचा 40 टक्के भाग कोसळला आहे. इमारत जीर्ण झाल्याने या इमारतीला टेकू देखील लावण्यात आले होते. साधारण पावणे चारच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती आहे. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्याला सुरुवात केली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20 जण अडकले असल्याचा स्थानिकांनी दावा केला आहे. 


दरम्यान, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तर इमारतीत राहणाऱ्या अन्य नागरिकांना इतरत्र हलवण्याचे काम सुरू आहे. 

Related Stories

DRDO ने उभारली ४५ दिवसात ७ माजली इमारत

Archana Banage

Maharashtra Budget 2023 : राज्याच्या बजेटमध्ये महिलांना काय मिळालं,जाणून घ्या एका क्लिकवर

Archana Banage

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्राद्वारे केली ‘ही’ मागणी

Tousif Mujawar

जम्मू काश्मीर : श्रीनगरच्या लारापोआमध्ये दहशतवादी हल्ला

Tousif Mujawar

हिरण्यकेशी पाणी प्रदुषणाचा ‘रात्रीस खेळ चाले’

Abhijeet Khandekar

सहाव ज्योतिर्लिंग आसाममध्येचं; महाराष्ट्रातील विरोधकांनी आसाम सरकारच्या दाव्यावर केली टीका, म्हणाले, वेडेपणा…

Archana Banage