Tarun Bharat

फोर्ट रोड येथे सिग्नलवर कोसळली झाडाची फांदी

प्रतिनिधी /बेळगाव

फोर्ट रोड जुन्या भाजी मार्केट येथे सोमवारी सकाळी झाडाची फांदी कोसळली. ही फांदी थेट सिग्नलवर कोसळल्याने सिग्नलचे नुकसान झाले आहे. सुदैवाने ही फांदी रहदारीच्यावेळी कोसळली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. जुन्या भाजी मार्केट परिसरात अनेक जुनाट झाडे आहेत. या झाडांच्या फांद्या नेहमी कोसळत असतात. या मार्गावरून दररोज शेकडो वाहनचालक ये-जा करत असतात. सोमवारी एका झाडाची फांदी कोसळली. ही फांदी सिग्नलवर कोसळल्याने सिग्नलचा एक भाग मोडला. त्यामुळे धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्याची मागणी होत आहे.

Related Stories

बागलकोट जिल्हय़ात दोघांना कोरोनाबाधा

Patil_p

गुणपत्रिका दुरुस्तीसाठी लाच

Amit Kulkarni

नीना स्पोर्ट्स, सीसीआय संघ विजयी

Amit Kulkarni

सीमाप्रश्न लवकरात लवकर निकालात काढा

Patil_p

कर्नाटक: माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला कोरोना

Archana Banage

स्पर्धेत यश

Patil_p