‘लागीरं झालं जी’ या मालिकेत फौजी अजिंक्य शिंदे म्हणजे अज्याची भूमिका साकारलेला अभिनेता नितीश चव्हाण सध्या त्याच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे. ‘आम्ही पळून जाऊन लग्न केलय… आमच्या जीवाला धोकाय’ असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय. नितेशची ही पोस्ट पाहून चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नेमकं काय झालंय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या पोस्टसोबत नितेशने स्वतःचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तो हातात एक फलक घेऊन उभा आहे. ‘आम्ही पळून जाऊन लग्न केलंय. आमच्या जीवाला धोकाय’ असं या फलकावर लिहिलेल आहे. ही पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.मी आतापर्यंत सोशल मीडियावर माझ्या रिलेशनबद्दल सांगितलं नाही. कारण घरच्यांचा विरोध होता आणि अजूनही आहे. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. कालच आम्ही पळून जाऊन लग्न केलंय, मला खरंतर हे असं सगळ्यांसमोर सांगायचं नव्हतं. पण कालपासून तिच्या घरून मला वारंवार धमक्या येत आहेत, म्हणून हे सांगावं लागतंय, असं नितीशने लिहिलंय. या पोस्टमध्ये त्याने मानसी भावलकर हिला टॅग केलंय. अर्थातच नितीशच्या नव्या सिनेमाच्या प्रमोशनचा हा फंडा असल्याचे उघड झाल्यानंतर नितीशसह सगळी टीम सोशल मीडियावर ट्रोल झाली. यापूर्वीही एका सिनेमाच्या प्रमोशनसाठी कुणीतरी माझा पाठलाग करतेय… मला ब्लँककॉल करतय अशी पोस्ट अभिनेता संग्राम समेळने पोस्ट केली. प्रमोशनसाठी कलाकार व्यक्तीगत पोस्ट करावी तशी पोस्ट करतात. यावरूनच नितीशला त्याच्या चाहत्याने रिप्लाय दिला आहे की कधीतरी खरच तू संकटात असशील आणि त्यातून वाचण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकशील पण तो प्रमोशन फंडा समजून तुला कुणीच मदत करणार नाही.


previous post