Tarun Bharat

फ्रान्सचा भारतीय हॉकी संघावर विजय

Advertisements

वृत्तसंस्था/ पोश्चेफस्ट्रूम

दक्षिण आफ्रिकेत शनिवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरूषांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेतील सामन्यात फ्रान्सने भारताचा  5-2 अशा गोलफरकाने धक्कदायक पराभव केला.

शनिवारच्या या सामन्यात भारतातर्फे जर्मनप्रित सिंगने 22 व्या मिनिटाला तर हरमनप्रित सिंगने 57 व्या मिनिटाला गोल नोंदविले. फ्रान्सतर्फे व्हिक्टर चार्लेटने 16 आणि 59 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदविले तर लॉकवूडने 35 व्या मिनिटाला, चार्लेस मॅसनने 48 व्या आणि क्लिमेंटने 60 व्या मिनिटाला गोल केले. या सामन्यात भारताच्या तुलनेत फ्रान्सचा खेळ अधिक आक्रमक आणि वेगवान झाला. सामन्यातील शेवटच्या दोन मिनिटामध्ये फ्रान्सने दोन गोल नोंदवीत भारताचे आव्हान संपुष्टात आणले. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते पण उत्तरार्धात भारताला केवळ एक गोल करता आला तर फ्रान्सने 4 गोल नोंदविले. या स्पर्धेत आता भारताचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर होत आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारत आता आपल्या गटातून तिसऱया स्थानावर आहे.

Related Stories

यूपी योद्धा, पुणेरी पलटनचे रोमांचक विजय

Patil_p

हार्दिक पंडय़ाचा अर्धशतकी झंझावात

Amit Kulkarni

सर्व सदस्यांची चाचणी निगेटिव्ह : चेन्नई सुपरकिंग्सला दिलासा

Patil_p

कोरोनाविरुद्ध मोहिमेत इस्ट बंगाल, बगानचा सहभाग

Patil_p

आशिया चषक स्पर्धेतून चमीरा बाहेर

Patil_p

रेल्वेतर्फे ऑलिम्पिकपटूंना मिळणार भरघोस बक्षीस

Amit Kulkarni
error: Content is protected !!