Tarun Bharat

फ्रान्सचा मालीमध्ये एअर स्ट्राईक; 50 दहशतवाद्यांचा खात्मा

Advertisements

ऑनलाईन टीम / पॅरिस : 

फ्रान्स एअर फोर्सने मालीमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अल-कायदाशी संबंधित 50 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरन्स पार्ली यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

पार्ली म्हणाले, मालीच्या सीमा भागात दहशतवाद्यांच्या दुचाकींचा मोठा ताफा ड्रोन विमानाच्या नजरेत आला. त्यानंतर फ्रेंच हवाई दलाने मिसाईल हल्ला करण्यासाठी दोन मिराज आणि एक ड्रोन विमान पाठवले. या लढाऊ विमानांनी केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये 50 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. 

एअर स्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या 30 दुचाकी नष्ट करण्यात आल्या. तसेच घटनास्थळावरून आत्मघातकी हल्ल्यासाठी वापरले जाणारे स्फोटकांचे पट्टे जप्त करण्यात आले आहेत. 

Related Stories

तुर्कस्तानला अमेरिकेकडून निर्बंधांची धमकी

Patil_p

ब्रिटनमध्ये मतांसाठी ‘मोदी’विरोध

Patil_p

पाकिस्तानात पत्रकाराचे अपहरण, सैन्यावर संशय

Patil_p

चीनमध्ये पाऊस-पूरामुळे मोठे संकट

Patil_p

“…तर तिसरं महायुद्ध होईल”; ज्यो बायडन यांचा इशारा

Archana Banage

‘कोव्हिशिल्ड’ घेतलेल्यांना ऑस्ट्रेलियात थेट एन्ट्री

Patil_p
error: Content is protected !!