Tarun Bharat

फ्रान्सचे विदेश मंत्री भारत दौऱयावर

एस. जयशंकर यांनी केले स्वागत

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

फ्रान्सचे विदेश मंत्री 4 दिवसांच्या भारत दौऱयावर आले आहेत. राजधानी नवी दिल्लीत मंगळवारी म्हणजेच 13 एप्रिल रोजी विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी जीन-यवेस ले ड्रियन यांचे स्वागत केले आहे. याचबरोबर जयशंकर यांनी युरोप आणि फ्रान्सच्या विदेश मंत्र्यांसोबत हैदराबाद हाऊसमध्ये शिष्टमंडळ स्तरीय चर्चा केली आहे.

ड्रियन हे भारत दौऱयादरम्यान जयशंकर यांच्यासोबत परस्पर हिताच्या द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांवर चर्चा करणार आहेत. हिंद-प्रशांत क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य बळकट करण्याप्रकरणी दोघेही भूमिका मांडणार आहेत. ड्रियन यांच्या दौऱयामुळे कोविड-19 नंतरचा व्यापार, संरक्षण, हवामान, शिक्षण आणि आरोग्यासह विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय भागीदारी अधिक मजबूत करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.

Related Stories

नेदरलँड्समध्ये दोन रेल्वेगाडय़ांची टक्कर

Patil_p

मोदींच्या दौऱ्यानंतर बांगलादेशात तणाव

Patil_p

चीनने वाढवले संरक्षण बजेट

datta jadhav

मानवी मेंदूत चिपचे परीक्षण

Patil_p

जगभरात 90 लाखांहून अधिक कोरोनाबाधित

datta jadhav

संयुक्त राष्ट्रसंघात रशियाविरोधी प्रस्ताव संमत

Amit Kulkarni
error: Content is protected !!