Tarun Bharat

फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत पंतप्रधानांची चर्चा

Advertisements

अफगाणिस्तानचा मुद्दा होता चर्चेत -फोनवरून दोन्ही नेत्यांदरम्यान संवाद

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये प्रामुख्याने अफगाणिस्तानातील स्थितीवर चर्चा झाली आहे. दोन्ही देशांनी आशिया-प्रशांत क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावर भर दिला आहे.

पंतप्रधानांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. माझे मित्र आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी अफगाणिस्तानच्या स्थितीवर चर्चा झाली. हिंद-प्रशांत क्षेत्रात भारत आणि फ्रान्समधील घनिष्ठ सहकार्यावरही चर्चा केली. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेसह फ्रान्ससोबतच्या आमच्या सामरिक भागीदारीला अत्यंत महत्त्व देतो असे मोदींनी म्हटले आहे.

मॅक्रॉन यांच्यासोबतची पंतप्रधानांची चर्चा महत्त्वपूर्ण ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अमेरिकेसाठी रवाना होणार आहेत. अमेरिकेच्या दौऱयादरम्यान अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीवरून जगातील प्रमुख देशांदरम्यान चर्चा होणार हे निश्चित. चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष मॅक्रॉन यांनी हिंद-प्रशांत क्षेत्रात वाढते द्विपक्षीय सहकार्य तसेच क्षेत्रातील स्थैर्य आणि सुरक्षेला प्रोत्साहन देण्याकरता भारत-फ्रान्स भागीदारीच्या ‘महत्त्वाच्या भूमिके’ची समीक्षा केली आहे.

ऑकसची पार्श्वभूमी

तर अमेरिकेने ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसोबत नवी त्रिपक्षीय आघाडी (ऑकस) निर्माण केली आहे. अमेरिकेने ऑस्ट्रेलियाला अणुऊर्जेने संचालित होणाऱया पाणबुडय़ा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. तर पाणबुडय़ांकरता फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात यापूर्वी करार झाला होता. पण अमेरिकेसोबत करार झाल्यावर ऑस्ट्रेलियाने फ्रान्ससोबतचा करार रद्द केला होता. यामुळे फ्रान्सने अमेरिका तसेच ऑस्ट्रेलियातील स्वतःचे राजदूत परत बोलाविले होते. या पार्श्वभूमीवर मोदींनी मॅक्रॉन यांच्याशी चर्चा केल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

अफगाणिस्तानातील स्थिती चिंताजनक

मोदी आणि मॅक्रॉन यांनी अफगाणिस्तानातील मानवाधिकारांसह महिला तसेच अल्पसंख्याकांचे अधिकार सुनिश्चित करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आहे. दोन्ही नेत्यांनी अफगाणिस्तानातील अलिकडच्या घडामोडींवरही चर्चा केली. या संदर्भात दोघांनी दहशतवाद, अमली पदार्थ, अवैध शस्त्रास्त्रs आणि मानवतस्करीच्या संभाव्य धोक्यांबद्दल स्वतःच्या चिंता व्यक्त केल्या असल्याचे पीएमओकडून सांगण्यात आले.

Related Stories

महाराष्ट्र विधानभवनाच्या पायरीवरच ‘फ्री स्टाईल’

Patil_p

कायद्यातील बदलांचा शेतकऱयांनाच फायदा

Patil_p

पाटणामध्ये ट्रेनने कारला दिली धडक; एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू

Tousif Mujawar

हिवाळी अधिवेशन नव्या संसद भवनात

Amit Kulkarni

दिल्लीत 249 नवे कोरोना रुग्ण ; 267 जणांना डिस्चार्ज

Tousif Mujawar

तबलीगमुळे 14 राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार

Patil_p
error: Content is protected !!