Tarun Bharat

फ्रान्सच्या पंतप्रधानपदी जीन कॅस्टेक्‍स

ऑनलाईन टीम / पॅरिस : 

फ्रान्सचे पंतप्रधान एदुआर्द फिलीप यांनी शुक्रवारी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्राध्यक्ष इम्युनेल मॅक्रॉन यांनी काहीच वेळात पंतप्रधानपदी जीन कॅस्टेक्‍स यांची निवड केली आहे.

एदुआर्द फिलीप हे तीन वर्षांपासून फ्रान्सच्या पंतप्रधानपदी कार्यरत होते. कोरोना संकटामुळे आलेल्या आर्थिक संकटात सापडलेल्या फ्रान्सला सावरू न शकल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. सध्या कोरोनामुळे फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा धक्का बसला आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान करण्याचे ठरवले आहे. देशाची फेरउभारणी करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, त्यासाठी नवा मार्ग वापरावा लागेल, असे मॅक्रॉन यांनी सांगितले. 

कॅस्टेक्‍स म्हणाले, कोरोनामुळे फ्रान्स मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे फ्रान्सचे जनजीवन पुन्हा हळूहळू सुरू करण्यात येण्यासाठी प्राथमिकता देण्यात येणार आहे. माझ्या दोन वर्षांच्या काळात देशाची पुनर्बांधणी करण्यासाठी नवीन योजना आखल्या जातील, ध्येयधोरणे ठरवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Abhijeet Khandekar

मुल्ला बरदारची सीआयए प्रमुखांनी घेतली भेट

Patil_p

राज्यभर पाऊस पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचे संकेत

Archana Banage

कर्नाटक सीईटी परीक्षा २८,२९ ऑगस्टला

Archana Banage

ब्लादिमीर पुतीन यांचे रशियात नवे डावपेच

Patil_p

वीज पडून मोटारसायकल जळून खाक

Archana Banage