Tarun Bharat

फ्रान्समध्ये लॉकडाऊन नाही बुस्टर डोसचा पर्याय

Advertisements

पॅरीस

 फ्रान्स सरकारने कोरोनाशी लढण्यासाठी नवी रणनीती आखली आहे. देश आता जनतेला तिसरा बुस्टर डोस देणार आहे. देशात कोरोनाची लाट पुन्हा पसरल्यास लॉकडाऊनचा अंमल केला जाणार नसल्याचे फ्रान्स सरकारने म्हटले आहे. जगभरात पुन्हा कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने साऱयांची चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रसार मोठय़ा प्रमाणात झाला आहे. फ्रान्समध्ये दरदिवशी 30 हजारावर रुग्ण कोरोनाचे आढळून येत असल्याने सरकारच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची बाब सरकारच्या निदर्शनास आली आहे. देशाचे आरोग्यमंत्री ओलीव्हीयर वेरन यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून दुसऱया व तिसऱया डोसमधला कालावधी 6 ऐवजी 5 महिन्यांचा म्हणजे कमी केला आहे. सरकारकडे लसींचा पुरेसा साठा असून तिसऱया लसीच्या बुस्टर डोस मोहिमेला लवकरच सुरुवात केली जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

Related Stories

‘सूर्यदत्त’च्या डॉ. चोरडिया यांना एशियन युके एक्सलन्स अवॉर्ड

Patil_p

पाकिस्तानात शीखधर्मीयाची हत्या

Amit Kulkarni

ब्रिटनमध्ये दुसरी लाट

Patil_p

डॅनियल पर्ल यांचा मारेकरी विश्रांतीगृहात

Patil_p

अशरफ घनी यांचा भाऊ तालिबानमध्ये सामील

datta jadhav

कुठलेच काम न दिल्याने खटला

Patil_p
error: Content is protected !!