Tarun Bharat

फ्रान्समध्ये सार्वजनिक स्थळी मास्क अनिवार्य

Advertisements

ब्राझीलमध्ये दिवसभरात 40 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण : जगभरात 1,34,87,215 बाधित

जगात आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण 1 कोटी 34 लाख 87 हजार 215 जणांना झाली आहे. यातील 78 लाख 76 हजार 470 बाधितांना संसर्गापासून मुक्ती मिळाली आहे. फ्रान्समध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणांवर पुढील काही आठवडय़ांपर्यंत मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी याची घोषणा केली आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 1 लाख 72 हजार 377 रुग्ण सापडले असून 30 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू ओढवला आहे.

फिलिपाईन्स : 11 नवे बळी

फिलिपाईन्समध्ये बुधवारी कोरोना संसर्गामुळे 11 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर दिवसभरात 1,392 नवे बाधित सापडले आहेत. देशातील बळींचा आकडा आता 1,614 वर पोहोचला आहे. तर एकूण रुग्णसंख्या 58,850 झाली आहे. बाधितांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांची संख्या वाढविण्यात आली आहे. तर अध्यक्ष रोड्रिगो दुतेर्ते हे राजधानी मनीलामधील टाळेबंदीसंबंधी निर्णय घेणार आहेत.

ब्राझीलमध्ये संकट तीव्रच

ब्राझीलमध्ये दिवसभरात 41 हजार 857 नवे कोरोनाबाधित सापडले असून 1,300 जणांचा मृत्यू ओढवला आहे. याचबरोबर देशातील रुग्णसंख्या 19,31,204 वर पोहोचली आहे. तर बळींचे प्रमाण 74,262 झाले आहे. ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांची मंगळवारी दुसऱयांदा कोरोना चाचणी करण्यात आली. परंतु या दुसऱया चाचणीचा अहवाल उघड करण्यास त्यांनी नकार दिला आहे.

पाकिस्तानात रुग्ण वाढतेच

पाकिस्तानात कोरोना संसर्गाचा कहर सुरूच आहे. बाधितांच्या संख्येत सातत्याने मोठी भर पडला आहे. पाकिस्तानात दिवसभरात 2,165 पेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. तर मागील 24 तासांमध्ये 67 बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबळींचे प्रमाण आता वाढून 5,386 झाले आहे. देशातील एकूण 2,55,769 रुग्णांपैकी 1,07,773 बाधित सिंध प्रांतात सापडले आहेत. पंजाबमध्ये 88,045 तर खैबर पख्तूनख्वामध्ये 31,001 आणि इस्लामाबादमध्ये 14,315 रुग्ण आढळून आले आहेत. इस्लामाबादमध्ये 14,315 आणि बलुचिस्तानात 11,239 तसेच गिलगिट-बाल्टिस्तानात 1,708 बाधित आहेत. मागील 24 तासांमध्ये पाकिस्तानात 21,749 चाचण्या पार पडल्या आहेत. देशात आतापर्यंत केवळ 16,27,939 चाचण्याच झाल्या आहेत.

सर्बिया, मोंटनग्रो असुरक्षित

युरोपीय महासंघाने सर्बिया आणि मोंटेनग्रो यांना स्वतःच्या सुरक्षित देशांच्या यादीतून वगळले आहे. युरोपीय महासंघाचे नागरिक आता या दोन्ही देशांमध्ये अनावश्यक कारणासाठी प्रवास करू शकणार नाहीत. जर्मनीने वाढता संसर्ग पाहता या दोन्ही देशांना सुरक्षित देशांच्या यादीतून वगळण्याचा प्रस्ताव मांडला होता, या प्रस्तावाला मंगळवारी मंजुरी मिळाली आहे.

कराकसमध्ये टाळेबंदी

व्हेनेझुएलाची राजधानी कराकस आणि शेजारील राज्य मिरांडामध्ये बुधवारपासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपाध्यक्ष डेल्सी रोड्रिग्यूज यांनी म्हटले आहे. व्हेनेझुएलामध्ये आतापर्यंत 9 हजार 707 रुग्ण सापडले असून 93 जणांचा बळी गेला आहे. जागतिक निर्बंधांमुळे अर्थव्यवस्था कोसळली असतानाच कोरोना संकटामुळे व्हेनेझुएलाची स्थिती दयनीय झाली आहे.

मॉडर्नाची कोरोनावरील लस पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण,

एमआरएनए-1273 : प्रतिद्रव्य वाढविण्याची अपेक्षा केली पूर्ण

मॉडर्ना ही अमेरिकन औषध कंपनी 27 जुलैपासून लसीच्या (एमआरएनए-1273) तिसऱया टप्प्यातील मानवी परीक्षण सुरू करणार आहे. जगभरातील कोरोनाबाधितांना ही लस विषाणूपासून सुरक्षित ठेवू शकते की नाही हे चाचणीत पाहिले जाणार  आहे. लस सुरक्षित असून ती शरीरातील प्रतिदव्याची (अँटीबॉडी) पातळी वाढवत असल्याचे स्पष्ट झाल्यावर तिसऱया टप्प्यातील चाचणीची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने मे महिन्यात घेतलेली दुसऱया टप्प्यातील चाचणी यशस्वी ठरली आहे. तिसऱया टप्प्यातील चाचणीची व्यापक स्तरावर तयारी सुरू असून यात 30 हजार स्वयंसेवक सामील होणार आहेत.

पहिल्या चाचणीचे निष्कर्ष

?एमआरएनए-1273 नावाची लस देण्यात आलेल्या स्वयंसेवकाच्या शरीरात सौम्य दुष्परिणाम दिसून आले आहेत. लसीचा प्रभाव सुरक्षित आणि सहन करण्याजोगा आढळून आला आहे. 

?लस मिळालेल्या स्वयंसेवकांची प्रतिकारशक्ती विषाणूशी लढण्यात कोविड-19 मधून बरे झालेल्या रुग्णांइतकी किंवा त्याहून अधिक शक्तिशाली आढळली आहे. याहून अधिक चांगल्या परिणामाची अपेक्षा नव्हती, असे कंपनीचे म्हणणे.

?मॉडर्नाने लसीसाठी आवश्यक जेनेटिक कोड प्राप्त करण्यापासून मानवी परीक्षणापर्यंतचा प्रवास केवळ 42 दिवसांमध्ये पूर्ण केला आहे. पहिल्यांदाच प्राण्यांपूर्वी मानवी चाचणी सुरू करण्यात आली.

?16 मार्च रोजी सिएटलमध्ये दोन मुलांची आई असलेल्या 43 वर्षीय जेनिफर या महिलेला ही लस देण्यात आली. पहिल्या चाचणीत 18 ते 55 वयोगटातील 45 स्वयंसेवकांना सामील करण्यात आले होते.

?चाचणीच्या प्रारंभिक टप्प्यात लस टोचलेल्या ठिकाणी लाल चट्टे तयार होण्याचे आणि थंडीसारखे अनुभव येतच असतात. एमआरएनए-1273 मध्ये कोविड-19 रोखण्याची क्षमता असल्याचे कंपनीचे प्रतिपादन.

100 मायक्रोग्रॅमचा डोज

लसीच्या पहिल्या टप्प्याच्या निष्कर्षांनी पुढील टप्प्याच्या तयारीसाठी उत्साह वाढविला आहे. चाचणी पूर्ण होताच या लसीचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेत जागतिक महामारीला रोखण्यासाठी आम्ही लोकांना मदत करू असे उद्गार मॉडर्नाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बेंसेल यांनी काढले आहेत. तिसऱया टप्प्यात सामील होणाऱया 30 हजार स्वयंसेवकांना दोन समुहांमध्ये विभागले जाणार आहे. 50 टक्के स्वयंसेवकांना लसीचा 100 मायक्रोग्रॅमचा डोज दिला जाणार आहे. तर अन्य 50 टक्के स्वयंसेवकांना सामान्य उपचार पुरविले जाणार आहेत.

Related Stories

भारतीय शास्त्रज्ञाने शोधली कोरोनावर लस

prashant_c

पाकिस्तानात पुन्हा हिंदू मंदिराची तोडफोड

datta jadhav

पाकिस्तानला धडा शिकविणार अमेरिका

Patil_p

जगभरात 61.72 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

तांत्रिकांच्या मदतीने गुन्हेगारांची धरपकड

Amit Kulkarni

कॅनडा, स्वीडनमध्येही नवा स्ट्रेन

Patil_p
error: Content is protected !!