Tarun Bharat

फ्रान्समध्ये 11 मे पर्यंत लॉक डाऊन

ऑनलाईन टीम / फ्रान्स :

संपूर्ण जगभरात कोरोना‌ व्हायरस थैमान घालत आहे. कोरोना‌ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत देशात तीन मे पर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे. अशातच मीडिया रिपोर्ट नुसार आता फ्रान्समध्ये देखील 11 मे पर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांनी यासंदर्भात घोषणा केली. 


फ्रान्स चे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांनी आपल्या ट्विटर वर लिहिले की, देशात 11 मे पर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात येत आहे. तसेच 11 मे नंतर हळूहळू सर्व व्यवहार सुरू करण्यावर विचार केला जाईल. 

गेल्या चोवीस तासात फ्रान्समध्ये  4 हजार 188 नवे रुग्ण आढळले असून 574 जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या फ्रान्समध्ये एकूण रुग्णांची संख्या एक लाख 36 हजार 779 असून आतापर्यंत 14 हजार 967 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

तर जगात आतापर्यंत 19 लाख 20 हजार 258 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Related Stories

धास्ती महापुराची…तयारी स्थलांतराची

Abhijeet Khandekar

आमच्याकडून कोणतेही बेकायदेशीर कृत्य होणार नाही – विधानसभा अध्यक्ष नार्वेकर

Archana Banage

कर्मचाऱयांना आता ‘वर्क फ्रॉम पब’ची ऑफर

Amit Kulkarni

बकरी ईदनिमित्त निर्बंध शिथिल, केरळ सरकारला नोटीस

Patil_p

शिवसेना मविआतून बाहेर पडणार पण… राऊतांनी घातली ‘ही’अट

Abhijeet Khandekar

अमेरिकेत कोरोनाचे मृत्यूतांडव

prashant_c