फ्रान्सचे माजी अध्यक्ष वेलेरी गिसकार्ड डिएस्टेंग यांचे कोरोना संक्रमणामुळे निधन झाले आहे. 94 वर्षीय वेलेरी यांना युरोपीय देशांना एकजूट करण्यासाठी ओळखले जाते. 1974 ते 1981 या कालावधीत ते अध्यक्ष होते. त्यांना काही दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संक्रमणातून बरे झाल्यावर ते घरीही परतले होते. परंतु बुधवारी त्यांना अचानक पुन्हा त्रास सुरू झाला. रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. फ्रान्समध्ये मागील काही दिवसांमध्ये कोरोनाचा संसर्ग मंदावला असून उपाययोजनांना यश मिळू लागले आहे.


previous post