Tarun Bharat

फ्रेंच स्पर्धेतील विजेती स्वायटेक क्वारंटाईनमध्ये

वृत्तसंस्था / वॉरसॉ

अलिकडेच झालेल्या फ्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेंत महिला एकेरीचे जेतेपद मिळविणारी पोलंडची पहिली महिला टेनिसपटू इगा स्वायटेकला क्वारंटाईनमध्ये राहावे लागत आहे.

आपल्या टेनिस कारकीर्दीत पहिले ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद जिंकल्यानंतर स्वायटेकने पोलंडचे राष्ट्रपती डुडा यांची भेट घेतली होती. दरम्यान पोलंडचे राष्ट्रपती डुडा यांना कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले. डुडा याची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि या चांचणीत ते पॉझिटिव्ह असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राष्ट्रृपती डुडा यांच्याशी संपर्क आल्याने खबरदारीचे उपाय म्हणून स्वायटेकने क्वारंटाईनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. पोलंड देशालाही कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे.

Related Stories

लॉर्ड्सवर शतक झळकावणारा केएल राहुल ठरला १० वा भारतीय खेळाडू

Amit Kulkarni

भारताचे माजी धावपटू केनेथ पॉवेल कालवश

Patil_p

कोव्हिड बदली खेळाडू, लाळबंदीवर आयसीसीचे शिक्कामोर्तब

Patil_p

पहिल्या कसोटीत इंग्लंड 6 बाद 116

Patil_p

जोकोविच, सिनर, जेबॉर विजयी तर केर्बर, सॅकेरी पराभूत

Patil_p

पाकिस्तान-द.आफ्रिका दुसरी कसोटी आजपासून

Patil_p