Tarun Bharat

फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांची प्रकृती पुन्हा बिघडली; ICU मध्ये दाखल

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


91 वर्षीय फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांनी शनिवारी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला. मात्र, गुरुवारी त्यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्यांना काल चंदीगड मधील पीजीआय रुग्णालयातील ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. 

रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे की, ऑक्सिजनची लेव्हल कमी झाल्याने त्यांना काल दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी रुग्णालयातील आयसीयू वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. 

दरम्यान, मिल्खा सिंग यांच्यासह त्यांच्या पत्नी निर्मला मिल्खा सिंग यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्या वर उपचार सुरू असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

मिल्खा सिंग यांनी आपल्या धावण्याच्या विलक्षण शैलीने जगभर भारताला पदके मिळवून दिली आणि फ्लाइंग सिख ही उपाधी मिळवली. पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख फिल्ड मार्शल आयुब खान यांनी त्यांना हा खिताब दिला होता. आशियाई खेळांमध्ये त्यांनी 4 तर राष्ट्रकूल स्पर्धेत एक सुवर्णपद जिंकले आहे.

Related Stories

रथावर शाह, व्हिलचेअरवर ममता

Patil_p

ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा; उद्या ११ पर्यंत राजीनामा स्वीकारण्याचे कोर्टाचे निर्देश

Archana Banage

उत्तराखंडमध्ये काँग्रेस नेत्यांमध्ये हमरातुमरी

Patil_p

राणेंच्या बंगल्यावरील कारवाईची नोटीस मागे

datta jadhav

कोरोनानंतर आता सुपरबगचा धोका

datta jadhav

पुण्यातील शाळा 30 जानेवारीपर्यंत राहणार बंद

Abhijeet Khandekar