Tarun Bharat

फ्लाईंग टेनिंग सेंटर एप्रिलपर्यंत सुरू होणार

Advertisements

बेळगावमध्ये साकारतेय पायलट प्रशिक्षण केंद्र : विमानतळाची जागा करार पद्धतीने दिली जाणार, स्थलांतरणाची केवळ अफवाच

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव विमानतळाला उभारी देणारे पालयट प्रशिक्षण केंद्र एप्रिल महिन्यापासून सुरू होण्याची शक्मयता आहे. सुसज्ज अशी दोन फ्लाईंग ट्रेनिंग सेंटर होणार असून त्यांच्या कामांनाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच बेळगावला पायलट तयार होणारे शहर म्हणून ओळखले जाणार आहे. हुबळी येथे फ्लाईंग टेनिंग सेंटर स्थलांतरित होणार ही केवळ अफवाच ठरली आहे.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी 5 विमानतळांवर 6 फ्लाईंग टेनिंग सेंटरला परवानगी दिली होती. बेळगावमध्ये 2 तर गुलबर्गा, महाराष्ट्रातील जळगाव, मध्यप्रदेश येथील खजुराहो, तामिळनाडू येथील सालेम, आसाम येथील लिलाबरी या विमानतळांवर प्रत्येकी एक प्रशिक्षण केंद्र होणार आहे. भविष्यात देशात कमर्शियल पायलटची आवश्यता भासणार असल्याने त्यादृष्टीने केंद्र सरकारने विमानतळांवर खासगी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बांधा-वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर फ्लाईंग टेनिंग सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी विमानतळाची जागा करार पद्धतीने दिली जाणार आहे.

दोन कंपन्यांना मिळाले कंत्राट

बेळगाव विमानतळावर दोन फ्लाईंग ट्रेनिंग सेंटरला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर त्यासंबंधी कंत्राट काढण्यात आले. दिल्ली येथील रेड बर्ड फ्लाईंग टेनिंग ऍकॅडमी प्रा. लि. तर बेंगळूर येथील समवर्धने टेक्नॉलॉजी प्रा. लि. या कंपन्यांना कंत्राट मंजूर करण्यात आले. 25 वर्षांच्या करारावर या दोन्ही कंपन्यांना 5 हजार चौरस मिटरची जागा देण्यात आली. जून 30 व जुलै 1 रोजी या दोन्ही कंपन्यांसोबत करारावर सहय़ा करण्यात आल्या आहेत.

टॅक्सिट्रकसाठी काढली निविदा

फ्लाईंग ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येणार असल्याने त्यासाठी सर्व ती तयारी केली जात आहे. करारानुसार एअरपोर्ट ऍथॉरिटी 247 मीटर लांबीचा व 10.5 मीटर रुंद टॅक्सिट्रक बांधणार आहे. यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. हँगर सुरू करण्यासाठी फॅब्रिकेशनच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यापर्यंत काम पूर्ण करून फ्लाईंग ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न टेनिंग कंपन्यांकडूनही करण्यात येत आहे.

स्थलांतरणाची केवळ अफवाच

बेळगाव विमानतळावर होणारे फ्लाईंग टेनिंग सेंटर हुबळीला स्थलांतरित करण्यात आल्याची केवळ अफवाच आहे. असा कोणताही आदेश अद्याप आमच्याकडे आलेला नाही. हुबळी येथे फ्लाईंग टेनिंग सेंटर सुरू होणार हे स्वागतार्ह आहे. परंतु  बेळगावचे सेंटर हुबळीला स्थलांतरित होणार, असा याचा अर्थ होत नाही. बेळगावमध्ये एप्रिलपर्यंत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे राजेशकुमार मौर्य यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.

राजेशकुमार मौर्य (संचालक, बेळगाव विमानतळ)

या कंपन्या सुरू करणार टेनिंग सेंटर

  • रेड बर्ड फ्लाईंग टेनिंग ऍकॅडमी प्रा. लि. दिल्ली.
  • समवर्धने टेक्नॉलॉजी प्रा. लि. बेंगळूर

Related Stories

झाडाची फांदी कोसळून वर्गखोल्यांचे नुकसान

Amit Kulkarni

आकाश निंगराणी ज्युनियर मि. बेळगाव

Amit Kulkarni

विकासकामाचा कृती आराखडा तयार करण्याची सूचना

Patil_p

जिल्हाधिकारी कार्यालय-न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

Patil_p

पावसाने झोडपले, जनजीवन विस्कळीत

Patil_p

खानापूर-रामनगर महामार्ग दुरुस्तीला प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!