Tarun Bharat

फ्लिपकार्टची पेटीएमबरोबर भागीदारी

नवी दिल्ली : येणाऱया उत्सवी काळात ग्राहकांना आकर्षक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी इ-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी फ्लिपकार्टने डिजिटल व्यवहार क्षेत्रात कार्यरत कंपनी पेटीएमबरोबर भागीदारी करण्याचे निश्चित केले आहे. रोख सवलतीसह अनेक लाभदायी योजना ग्राहकांसाठी उत्सवी काळात जाहीर केल्या जाणार आहेत.

वॉलमार्टची मालकी असणाऱया इ-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी फ्लिपकार्टने येणाऱया उत्सवासाठी खरेदीत होणारी संभाव्य वाढ लक्षात घेऊन पेटीएमसोबत भागीदारी केली आहे. पेटीएमअंतर्गत रक्कम देय करणाऱया ग्राहकांना रोख सवलतीसह अनेक योजनांचा लाभ उठवता येणार आहे. फ्लिपकार्टचा लवकरच ‘बिग बिलियन डेज’ हा सेल सुरू होणार आहे त्यात पेटीएम वापरणाऱया ग्राहकांना खरेदी करून लाभ पदरात पाडून घेता येणार आहे. पेटीएम वॉलेट व पेटीएम युपीआयमार्फत रक्कम भरणाऱया ग्राहकांना तात्काळ खरेदीवर रोख रक्कम सवलतीरूपात मिळणार असल्याचे कंपनीने सांगितले. ‘बिग बिलियन डेज’ सेल 16 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. याअंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना वाढण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासोबत इतर कंपन्याही सेलचे आयोजन येणाऱया काळात करत आहेत. मिंत्रावर बिग बिलीयन सेल 16 ते 22 ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे. स्नॅपडीलचीही सेलची तारीख लवकरच घोषित होणार आहे.

Related Stories

आयएमएफने भारताचा जीडीपी अंदाज घटवला

Amit Kulkarni

फ्लिपकार्टला मिळाली मनेसरमध्ये जागा

Omkar B

एलकॉन इंजिनियरिंगचा उत्तम परतावा

Patil_p

जागतिक संकेतामुळे सेन्सेक्स नुकसानीत

Patil_p

हायड्रोजन क्षेत्रात 150 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे संकेत

Patil_p

कांदा झाला कवडीमोल

Archana Banage