Tarun Bharat

फ्लॅटच्या आमिषाने एक कोटींची फसवणूक; आरोपी अटकेत

सातारा / प्रतिनिधी :

मुंबई येथे म्हाडा प्रकल्पातंर्गत फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवून 99 लाख 84 हजार रूपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. मागील 3 वर्षांपासून हा आरोपी मीरारोड पोलीस ठाणेच्या रेकॉडवरील वॉन्टेड गुन्हेगार होता. अरूण गणपत शिंदे (वय 52, मूळ रा. माणगाव जि. रायगड) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबई येथे म्हाडा प्रकल्पामध्ये अधिकारी असल्याचे भासवून त्या अंतर्गत फ्लॅट देतो असे भासवून फसवणूक करणारा आरोपी अरूण गणपत शिंदे हा सातारा शहर परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती सातारा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला गोडोली परिसरात अत्यंत शिताफीने पकडण्यास पोलिसांना यश आले. याच्यावर मुंबई येथील मीरारोड, जोगेश्वरी, रबाळे अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात फसवणूक, चेक बाऊन्सचे गुन्हे दाखल आहेत. तो तीन वर्षापासून फरार होता. पुढील कारवाईसाठी या आरोपीला मीरारोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Related Stories

हवाई वाहतूक मंत्र्यांना मलकापूर पालिकेचे साकडे

Amit Kulkarni

बाधित वाढ मंदावतेय, मृत्यूदराचा आलेख खाली

Amit Kulkarni

सातारा : कोरोना गर्दीने नाही बाहेरुन येणार्‍यांमुळे वाढला, व्यापार्‍यांचा लॉकडाऊनला विरोध

Archana Banage

सातारा : दरोडा प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी केली अटक

Archana Banage

सातारा : रेशनिंग कार्डला आधार लिंक करण्याची मुदत वाढवून मिळावी; अन्यथा आंदोलन…

datta jadhav

सातारा जिल्ह्यात सकाळपासून २१ कोरोनाबाधित

Archana Banage