Tarun Bharat

फ्लॅट देण्याचे सांगून लाखो रूपयांची फसवणूक करणारा गजाआड

प्रतिनिधी/ सातारा

मुंबई येथे म्हाडा प्रकल्प अतंर्गत प्लॅट देण्याचे सांगून 99 लाख 84 हजार रूपयांची फसवणूक करून सुमारे 3 वर्षापासून मीरारोड पोलीस ठाणेच्या रेकॉडवरील पाहिजे असलेल्या आरोपीस ताब्यात घेण्यात सातारा शहर पोलीसांना यश आले आहे. अरूण गणपत शिंदे (वय 52, मूळ रा. माणगाव जि. रायगड) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

 पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी पथकातील अधिकारी समीर कदम व पथकास मुंबई येथे म्हाडा प्रकल्पामध्ये अधिकारी असल्याचे भासवून त्या अंतर्गत फ्लॅट देतो असे सांगून फसवणूक करणारा आरोपी अरूण गणपत शिंदे हा सातारा शहर परिसरात येणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्याला गोडोली परिसरात अत्यंत शिताफीने पकडण्यास पोलिसांना यश आले. याच्यावर मुंबई येथील मीरारोड, जोगेश्वरी, रबाळे अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात फसवणूक, चेक बॉन्सचे गुन्हे दाखल आहेत. तो तीन वर्षापासून फरार होता.   या कारवाईत पोलीस नाईक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, अभय साबळे, पोलीस कॉन्टेबल गणेश घाडगे, संतोष कचरे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ यांनी केली आहे. पुढील कारवाईसाठी या आरोपी अरूण याला मीरारोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे

Related Stories

शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या महिला अधिकाऱयाची इतकी अवहेलना होऊ नये

Tousif Mujawar

विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचविण्यात वनविभागाला यश

datta jadhav

एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी यांनाही ईडीकडून समन्स

Archana Banage

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियावर (UIDAI) ओढवली ही नामुष्की

Kalyani Amanagi

ऐन पावसाळ्यात भाजपची छत्री काँग्रेसकडे दुरुस्तीला ; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Archana Banage

शुक्रवारी ‘गप्पा कोविडायन’च्या…

datta jadhav