Tarun Bharat

बँकिंग-आयटीसह धातू क्षेत्राने बाजार सावरला

Advertisements

वृत्तसंस्था / मुंबई

भारतीय शेअर बाजारात चालू आठवडय़ातील गुरुवारच्या सत्रात तेजीचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये वायदा बाजारासह सौद्याची समाप्ती होत असल्याच्या संकेतामुळे दिवसअखेर सेन्सेक्स 98 अंकांनी वधारुन बंद झाला आहे. दुसऱया बाजूला निफ्टीमधील मिडकॅप निर्देशांक 0.54 टक्क्यांच्या मजबूतीसह बंद झाल्याची नेंद केली आहे.

दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीमुळे बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 97.70 अंकांनी वधारुन निर्देशांक 51,115.22 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 36.40 अंकांच्या मजबूतीसह निर्देशांक 15,337.85 वर स्थिरावला आहे.

भारतीय शेअर बाजार सावरण्यास प्रामुख्याने बँकिंग, आयटी, मीडिया, वाहन आणि फायनाशिअल सर्व्हिसेजची कामगिरी लाभदायक ठरली आहे. यासह निफ्टीमधील सर्वाजनिक क्षेत्रातील बँक 2.84, बँक 1.18, आयटी 1.14, मीडिया 0.99, धातू 0.77, वाहन 0.46 आणि फायनाशिअल सर्व्हिसेसचा निर्देशांक 0.16 टक्क्यांच्या मजबूतीसह बंद झाला आहे.

  अन्य क्षेत्रांपैकी एफएमसीजीचे समभाग 0.01 टक्क्यांची घसरण राहिल्यासोबत निफ्टीत एनर्जी 0.13 टक्के, औषध 0.19 आणि रियल्टी 1.19 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाल्याचे पहावयास मिळाले. गुरुवारच्या सत्रात सकारात्मक प्रारंभ झाला, त्यानंतर बाजारामध्ये समभाग खरेदीने तेजी पकडली होती  यामुळे निफ्टीने 15 हजारचा टप्पा गाठला.

बाजाराची आगामी वाटचाल…

भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरताना दिसत आहे. यामुळे येत्या काही काळात भारती अर्थव्यस्थेमधील आलेली मरगळ कमी होत जात  पुन्हा वेगाने अनलॉक प्रक्रिया सुरु होऊन सकारात्मक मान्सूनच्या प्रवेशामुळे कृषी क्षेत्राच्या मजबूतीमुळे अर्थव्यवस्था सकारात्मक राहण्यास प्रारंभ होणार असल्याचे संकेत विविध रेटिंग्स कंपन्यांनी नोंदवलेल्या जीडीपी अंदाजावरुन सांगितले आहे. यामुळे गुंतवणूकदारांमधील विश्वास मजबूत होत, गुंतवणूकदारांना फायदा होणार असल्याचेही अभ्यासकांनी म्हटले आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

 • स्टेट बँक………. 425
 • कोटक महिंद्रा. 1778
 • ऍक्सिस बँक….. 750
 • बजाज ऑटो… 4246
 • अल्ट्राटेक सिमेंट 6679
 • नेस्ले……….. 17764
 • पॉवरग्रिड कॉर्प. 228
 • टेक महिंद्रा…. 1019
 • टायटन……… 1597
 • इंडसइंड बँक.. 1006
 • टीसीएस……. 3180
 • महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 827
 • लार्सन ऍण्ड टुब्रो 1482
 • इन्फोसिस….. 1404
 • रिलायन्स इंडस्ट्रीज 1978
 • एशियन पेन्ट्स 2969
 • आयटीसी…….. 211
 • एचडीएफसी बँक 1479
 • आयसीआयसीआय 652
 • रिलायन्स इन्फ्रा.. 68
 • पिरामल एन्टर 1808

समभाग घसरलेल्या कंपन्या

 • एचडीएफसी.. 2507
 • बजाज फायनान्स 5683
 • ओएनजीसी….. 111
 • भारती एअरटेल 519
 • हिंदुस्थान युनि 2327
 • मारुती सुझुकी 6964
 • एनटीपीसी…… 110
 • सन फार्मा……. 699
 • एचसीएल टेक.. 941
 • बजाज फिनसर्व्ह 11883
 • डॉ. रेड्डीज लॅब 5274
 • कमिन्स……….. 771
 • डीएलएफ…….. 283
 • ज्युबिलंट फूड. 3109
 • आयशर मोर्ट्स 2605
 • डाबर इंडिया… 527
 • अदानी पोर्ट….. 751
 • कोल इंडिया….. 144
 • वेदान्ता……….. 267
 • बायोकॉन…….. 381
 • मदरसन सुमी   233

Related Stories

ओमिक्रॉनच्या दहशतीखाली बाजार गडगडला

Patil_p

34.57 टक्क्मयांची निर्यातीत घसरण

Patil_p

सौर ऊर्जा क्षमतेत केली भारताने वाढ

Patil_p

प्रभावी मार्केटिंग अधिकारी ठरले संथानम

Patil_p

जगातील सर्वात स्वस्त डाटा भारतामध्ये

Patil_p

बायोकॉनच्या निव्वळ नफ्यात घसरण

Patil_p
error: Content is protected !!