Tarun Bharat

बँक ऑफ इंडियाचा नफा 90 टक्क्यांनी वधारला

तिमाहीमधील आकडेवारीचा समावेश : थकीत कर्जाची स्थिती सुधारल्याचा परिणाम

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

बँक ऑफ इंडियाची थकीत कर्जाच्या स्थितीत सुधारणा झाल्याच्या कारणास्तव डिसेंबर 2021 मध्ये समाप्त झालेल्या तिसऱया तिमाहीत निव्वळ नफा 90 टक्क्यांनी वधारुन 1,027 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला असल्याची माहिती बँकेने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट करण्यात आली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने मागील आर्थिक वर्षातील समान कालावधीत 540.72 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. बँक ऑफ इंडियाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार तिसऱया तिमाहीत एकूण उत्पन्न कमी होत 11,211.14 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे मागील आर्थिक वर्षातील समान कालावधीत 12,310.92 कोटीवर राहिले होते.

Related Stories

गोल्ड हॉलमार्किंगच्या दुसऱया टप्प्यास प्रारंभ

Amit Kulkarni

चॅटजीपीटीचे स्पर्धक बार्ड 180 देशांमध्ये लाँच

Amit Kulkarni

सोनालिकाची ट्रक्टर्स विक्री वाढली

Patil_p

टाटा समूह सुपरअॅपमध्ये गुंतवणार 16 हजार कोटी

Patil_p

अशोक लेलँड करणार बेंगळूर परिवहनला इलेक्ट्रिक बस पुरवठा

Patil_p

ऑक्टोबरपासून टीव्हींच्या किंमती वाढणार ?

Patil_p
error: Content is protected !!