Tarun Bharat

बँक कर्मचारी सेवेत ; मात्र ग्राहकांची पाठ

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव शहर व तालुक्मयातील बँक कर्मचारी सेवा देत असूनही ग्राहकांनी मात्र पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांना आर्थिक व्यवहार करता यावेत, यासाठी दुपारपर्यंत बँका सुरू करण्यात आल्या आहेत. बँकांमध्येही कोरोनाच्या धास्तीने काही अंतरावर दोऱया बांधण्यात आल्या असून ग्राहकांना दुरूनच व्यवहार करावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लॉकडाऊनच्या निर्णयानंतर बँका सुरू राहतील की नाही, असा प्रश्न ग्राहकांच्या मनात होता. परंतु प्रशासनाच्या नियमावलीनुसार दुपारपर्यंत बँका सुरू करण्यात येत आहेत. सर्व राष्ट्रीयीकृत बँका सुरू आहेत. ग्राहकांना पैशांची चणचण भासू नये यासाठी बँका सुरू ठेवण्यात आल्या आहेत. बँकांचे इतर व्यवहार बंद ठेवण्यात आले असले तरी केवळ पैसे भरणे व काढणे हे व्यवहार सुरू आहेत.

सोमवारी शहरातील काही बँकांमध्ये तुरळक प्रमाणात ग्राहक दिसून येत होते. प्रत्येक बँकेमध्ये 50 टक्केच कर्मचारी कामावर बोलाविण्यात आले होते. बँकांमध्ये मोजक्मयाच व्यक्तींना प्रवेश दिला जात होता. एकाचवेळी गर्दी होणार नाही यासाठी मार्किंग करण्यात आले आहे. बँकांचे सुरक्षा रक्षक मोजक्मयाच व्यक्तींना प्रवेश देत असल्याने गर्दी टाळता आली.

एटीएम व्यवस्था सुधारण्याची गरज

सामान्य नागरिकांना लॉकडाऊनमुळे बँकांपर्यंत पोहोचणे शक्मय नसल्यामुळे एटीएम हा पर्याय उपयुक्त ठरत आहे. परंतु शहर व उपनगरांमध्ये अनेक एटीएममध्ये चलन नसल्यामुळे ते शटडाऊन करावे लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक एटीएम सुरू राहील यासाठी संबंधित बँकांनी लक्ष पुरविणे गरजेचे आहे. एटीएम सुरू झाल्यास बँकांमधील होणारी गर्दी टाळता येणार आहे. नागरिकांना आपल्या घराजवळील बँकेतून पैसे काढणेही शक्मय होणार आहे.

Related Stories

काकती शिवारात विद्युत खांब धोकादायक

Amit Kulkarni

घरबसल्या होणार शेळय़ा-मेंढय़ांची विक्री

Amit Kulkarni

केएलएस पब्लिक स्कूलतर्फे बक्षीस वितरण

Amit Kulkarni

राजकीय इच्छाशक्ती अभावी सीमाप्रश्न प्रलंबित

Amit Kulkarni

काकती येथील त्या धरणाची पंचायत राज्य मुख्य सचिवांकडून प्रशंसा

Patil_p

बांधकाम कामगारांनाच पॅकेजची रक्कम द्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!