Tarun Bharat

बंगालचा हैद्राबादवर मोठा विजय

वृत्तसंस्था/ कल्याणी

अष्टपैलू आणि फिरकी गोलंदाज शहबाज अहमदच्या शानदार हॅट्ट्रीकसह घेतलेल्या सहा बळींच्या जोरावर यजमान पश्चिम बंगालने मंगळवारी खेळाच्या तिसऱया दिवशी रणजी सामना एक डाव 303 धावांनी जिंकला. या सामन्यात हैद्राबादची कामगिरी अत्यंत निकृष्ट झाली. या सामन्यात बंगालने 7गुण मिळविले.

या सामन्यात बंगालने आपला पहिला डाव 7 बाद 635 धावांवर घोषित केला. त्यानंतर हैद्राबादचा पहिला डाव 46.3 षटकांत 171 धावांत आटोपला. बंगालने त्यांना फॉलोऑन दिला. हैद्राबाद दुसरा डाव 46.2 षटकांत 161 धावांत संपुष्टात आला. बंगालने रणजी स्पर्धेच्या गुण तक्त्यात 5 सामन्यांतून 19 गुण घेतले आहेत. बंगालचा या स्पर्धेतील पुढील सामना 27 जानेवारीपासून दिल्ली संघाविरूद्ध होत आहे. 25 वषींय शहबाज अहमदने आपल्या सातव्या रणजी सामन्यात हॅट्ट्रीक साधली. बंगालच्या मनोज तिवारीने शानदार नाबाद त्रिशतक (303) झळकविले.

संक्षिप्त धावफलक

बंगाल प. डाव 7 बाद 635 (मनोज तिवारी नाबाद 303), हेद्राबाद प.डाव- 46.3 षटकांत सर्वबाद 171 (जावेद अली 72, शहबाज अहमद 4-26). हैद्राबाद दु. डाव 46.2 षटकांत सर्वबाद 161 (रवि तेजा 53, शहबाज अहमद 6 बळी, आकाशदीप 4-38).

Related Stories

ऍशेस मालिकेतील चौथी कसोटी आजपासून

Patil_p

‘फिट इंडिया’ वॉकेथॉनला प्रारंभ

Patil_p

महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासाठी बाबर आझम, फक्र झमान यांची शिफारस

Amit Kulkarni

प्रणॉयकडून ऑलिम्पिक विजेत्या एक्सलसनला धक्का

Patil_p

ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर लंकन फिरकीपटूंचे आव्हान

Patil_p

अर्जेन्टिना-चिली लढत बरोबरीत

Patil_p