Tarun Bharat

बंगालमध्ये लसीकरणावरून राजकारण

Advertisements

भाजपकडून मोफत लसीचे आश्वासन- ममतांकडून पूर्वीच घोषणा

पश्चिम बंगालच्या राजकीय युद्धात कोरोनावरील लस नवे शस्त्र ठरले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेस दोघांनीही राज्याच्या सर्व लोकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात 5 मेपासून मोफत लसीकरण सुरू करणार असल्याची घोषणा गुरुवारी केली आहे. याच्या प्रत्युत्तरादाखल भाजपनेही राज्यात सत्तेवर आल्यानंतर सर्वांना मोफत कोरोना लस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात होणाऱया विधानसभा निवडणुकीचे 6 टप्पे पार पडले आहेत. राज्याच्या 294 विधानसभा मतदारसंघांपैकी 27 मार्च रोजी 30 जागांवर, 1 एप्रिल रोजी 30 तर 6 एप्रिल रोजी 31 मतदारसंघांकरता मतदान पार पडले होते. 10 एप्रिल रोजी 44 जागांवर, 17 एप्रिल रोजी 45 आणि 22 एप्रिल रोजी 43 जागांकरता मतदान झाले होते. सातव्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी 36 जागा आणि आठव्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी 35 जागांकरता मतदान होणार आहे. ही आकडेवारी पाहिल्यास एकूण 71 जागांकरता मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही पक्षांनी मोफत लसीचे आश्वासन दिले आहे.

बंगाल भाजपने 23 एप्रिल रोजी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र प्रसारित करून पक्ष सत्तेवर आल्यास राज्यातील सर्व लोकांना मोफत लस देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

भाजपूर्वी तृणमूल काँग्रेसने ममता बॅनर्जींची चित्रफित प्रसारित केली होती. यात 5 मे पासून राज्यात 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व लोकांना मोफत लस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीकरता जाहीर घोषणापत्रात भाजपने मोफत कोरोना लसीचे आश्वासन दिले होते. विरोधी पक्षांनी याला आचारसंहितेचे उल्लंघन करत निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. पण आयोगाने भाजपला क्लीनचिट दिली होती.

Related Stories

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण

Patil_p

भारत-पाकिस्तान सीमेवर तीन वर्षांनंतर मिठाईवाटप

Amit Kulkarni

शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत स्वप्नांची राख; सहा एकर ऊस जळून लाखों रूपयांचे नुकसान

Abhijeet Khandekar

जयसिंगपूर येथील तीन रेशन दुकानांचे परवाने रद्द, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई

Abhijeet Khandekar

रायगडच्या घोणसे घाटात बस कोसळली, दोन ठार

Rahul Gadkar

गुजरात निवडणुक : इसुदान गढवी आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!