Tarun Bharat

बंगाल विधानसभेत जोरदार हाणामारी

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

पश्चिम बंगाल विधानसभेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि टीएमसी आमदारांमध्ये जोरदार राडा झाला आहे. यावेळी सभागृहातच भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये यावेळी जोरदार हाणामारी झाली. यानंतर भाजपाच्या पाच आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यावेळी भाजपा आमदार मनोज तिग्गा यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तर तृणमूलचे आमदार असित मजुमदार यांनी हाणामारीत आपण जखमी झाल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, बंगाल विधानसभेत भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये जोरदार हाणामारी झालीय. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बंगाल विधानसभेत भाजप आमदार मनोज तिग्गा आणि टीएमसी आमदार असित मजुमदार यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या भांडणात असित मजुमदार जखमी झाले असून या प्रकरणी पाच आमदारांचं निलंबन झाल्याचं कळतंय. बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आमदारांनी आरोप केलाय की, विधानसभेत बीरभूम प्रकरणावर चर्चा करत असताना टीएमसी आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आणि भाजपच्या आमदारांना मारहाण केलीय, असं त्यांनी नमूद केलंय. या मारहाणीनंतर भाजपचे आमदार विधानसभेतून बाहेर पडले.

या घटनेचं व्हिडीओ समोर आला असून विधानसभेतील या व्हिडीओत आमदार एकमेकांना ढकलत असून हाणामारी करत असल्याचं दिसत आहे. तसंच शर्ट फाडत असल्याचंही दिसत आहे. “त्यांना मला ढकललं, शर्ट फाडला,” असं ते सांगत आहेत.

Related Stories

मीडियाला कळते मग पोलिसांना का नाही : देवेंद्र फडणवीस

Abhijeet Shinde

आप ही आधुनिक ईस्ट इंडिया कंपनी : चन्नी

Sumit Tambekar

राबडीदेवींवर आधारित वेबसीरिज

Patil_p

भाजपकडून महानगरपालिकेतील कचरा घोटाळ्य़ाचा भांडफोड

Sumit Tambekar

मुस्लीम कुणाचेच गुलाम नाहीत : ओवैसी

Omkar B

राजस्थानची तनिष्का ‘नीट-युजी’मध्ये अव्वल

Amit Kulkarni
error: Content is protected !!