Tarun Bharat

बंडातात्यासाठी आ.महेश शिंदे वारकरी वेशात रस्त्यावर

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात घुमला ज्ञानोबा तुकारामचा गजर

प्रतिनिधी/ सातारा

राज्य सरकारनेच स्थानबद्ध केलेल्या ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांची मुक्तता करण्याच्या मागणीसाठी राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी वारकरी वेशात अनोखे आंदोलन केले. त्यांनी या आंदोलनाने राज्य सरकारला घरचा आहेर दिला. आमदार महेश शिंदे यांनी दाखवलेल्या पाठींब्यामुळे वारकऱयांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अगदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ग्यानबा, तुकाराम, माऊली असा गजर सुरु होता. टाळ, चिपळय़ाच्या जयघोषात हे आंदोलन सुरु होते. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देवून त्यांनी लवकर बंडातात्यांना मुक्त करा, अशी मागणी केली.

व्यसनमुक्त युवक महासंघाचे संस्थापक गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घेतलेल्या गेलेल्या पवित्र्यामुळे त्यांना कराड येथील त्यांच्या मठात स्थानबद्ध केलेले आहे. त्यांना पोलिसांनी मुक्त करावे, त्यांची सुटका करावी या मागणीसाठी वारकऱयांनी शुक्रवारी आंदोलन केले. त्या आंदोलनामध्ये आमदार महेश शिंदे यांनी पाठिंबा दिला होता. हाती टाळ घेत ग्यानबा तुकारामचा गजर केला.

मीडियाशी बोलताना आमदार महेश शिंदे म्हणाले, गुरुवर्य कराडकर यांची शासनाने स्थानबद्धता केलेली आहे. वारकरी प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्यावतीने त्यांना सांगितले आहे की तात्यांना मुक्त करुन त्यांना पंढरपूरला जाण्याची अनुमती दिली गेली पाहिजे. शासनाशी बोलून योग्य तो निर्णय घेतला जाईल. पण जर असे झाले नाही तर वारकऱयांमध्ये एक वेगळी भावना निर्माण होईल. महाराष्ट्रात आंदोलने होत आहेत. निवडणुका होत आहेत, असे असताना अद्यात्मिक शर्क्तींना आपण असे थांबवू शकत नाही. वारकरी सुद्धा कोरोनाचे सगळे नियम पाळून वारीला जावू शकतात. शासनाने चांगला नियम केला पाहिजे. या नियमानुसार वारी झाली पाहिजे असे आमचे शासनाला आवाहन आहे. युवकमित्र बंडातात्यांची स्थानबद्धतेतून मुक्तता करावी. तात्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे स्नेहाचे संबंध आहेत. मुख्यमंत्री तात्यांना मानतात. मी आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. जिल्हा प्रशासनाची ही कारवाई आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन द्यायला आलो आहे, मी एक आमदार म्हणून नव्हे तर सामान्य वारकरी म्हणून आलो आहे, एका बाजूला निवडणुकीला परवानगी मिळते आणि दुसऱया बाजूला वारीला परवानगी मिळत नाही, असे त्यांनी सांगितले. या आंदोलनात संदीप शिंदे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Stories

9 वी आणि 11 वी च्या विद्यार्थ्यांना परिक्षेविनाच उत्तीर्ण करणार : शिक्षण विभागाचा निर्णय

Tousif Mujawar

तारगाव शेतकरी हायस्कूलच्या जमिनीवर रेल्वे कामास ग्रामस्थांचा विरोध

Archana Banage

जान्हवी इंगळे यांचा सत्कार

Patil_p

महाराष्ट्रातील ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा नाही : ऊर्जामंत्री

Tousif Mujawar

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा बँकेवर बिनविरोध

Abhijeet Khandekar

म्हसवड उपनगराध्यक्षा स्नेहल सुर्यवंशींचा राजीनामा

Amit Kulkarni