Tarun Bharat

बंदीपोरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Advertisements

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू-काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यातील वातनिरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले असून, सध्या या भागात शोध मोहीम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंदीपोरा जिल्ह्यातील वातनिरा भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या तुकडीने या परिसराला वेढा घातला. दहशतवाद्यांनी स्वत:ला घेरलेले पाहून सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले. परंतु, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरूच ठेवला. सुरक्षा दलांनी या गोळीबाराला प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

Related Stories

2002 मध्ये धडा शिकविल्यावर शांतता प्रस्थापित

Patil_p

Monsoon News: जाणून घ्या कोणत्या तारखेला मान्सून तुमच्या भागात पोहोचेल…

Archana Banage

पेगॅसस प्रकरणावर न्यायालयाबाहेर चर्चा नको

Amit Kulkarni

राज्यातील रुग्णसंख्या 51 हजार पार

Patil_p

मुलायम यादवांच्या सुनेकडून राम मंदिर उभारणीसाठी देणगी

Patil_p

मुलगी अल्पवयीन असली तरी निकाह वैध

Patil_p
error: Content is protected !!