Tarun Bharat

बंदीपोरात शाकीर अल्ताफसह तिघांचा खात्मा

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये शाकीर अल्ताफ बाबाचाही समावेश आहे. 2018 मध्ये तो अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानात गेला होता. काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार यांनी शाकीर अल्ताफ बाबा यांच्या मृत्यूची पुष्टी केली.

शनिवारी पहाटे बंदीपोरा जिल्ह्यातील सुमलारच्या शोकबाबा जंगल भागात दहशतवाद्यांच्या मोठ्या गटाच्या हालचालींचे पोलिसांना इनपुट मिळाले. त्याआधारे जम्मू-काश्मीर पोलिसांनी 13 राष्ट्रीय रायफल्स (आरआर), सीआरपीएफ आणि लष्करातील एलिट पॅरा फोर्स मार्कोसच्या जवानांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केली.  

वनक्षेत्र असल्याने सुरक्षा दलांनी पूर्ण सतर्कतेने शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यात तीन दहशतवाद्यांना खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तैयबाशी संबंधित पाच दहशतवादी, एक स्थानिक आणि इतर चार पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हा गट होता. 

Related Stories

भ्रष्टाचाराची कीड दूर करा !

Patil_p

देशात एका दिवसात वाढले 90 हजार कोरोना रुग्ण; एकूण रूग्णसंख्या 41 लाखांवर

datta jadhav

यूपी : सर्व जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू

datta jadhav

विरोधी पक्षांकडून विकासकार्यात अडथळा

Patil_p

अविश्वसनीय, अकल्पनीय… जिमी टाटा @ 2-बीएचके

Patil_p

चंद्राबाबूंच्या रोड शोमध्ये चेंगराचेंगरी; नऊ ठार

Patil_p