Tarun Bharat

बंदी असूनही पर्यटक आंबोलीत

पोलिसांची 45 जणांवर कारवाई

वार्ताहर / आंबोली:

आंबोलीत रविवारी पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या 45 पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस वाहतूक शाखा आणि आंबोली पोलिसांनी संयुक्तपणे केली. कर्नाटक आणि कोल्हापूर जिल्हय़ातील पर्यटकांना चेकपोस्टवरून माघारी पाठविण्यात आले.

आंबोलीत पावसाळी पर्यटन आणि रविवार असला की पर्यटकांची पावले आपोआपच आंबोलीकडे वळतात. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ातील पर्यटन केंदे बंद आहेत. तरीदेखील पर्यटक येत आहेत. त्यातील विनंती करूनही न जुमानणाऱया 45 पर्यटकांवर कारवाई करण्यात आली. काहींना चेकपोस्टवरून माघारी पाठविण्यात आले. त्यात अधिकतर बेळगाव, कोल्हापूर जिल्हय़ातील पर्यटक होते.

रविवारी सकाळपासूनच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली, पोलीस नाईक दीपक शिंदे, कॉन्स्टेबल अभिजीत कांबळे, राजेश नाईक, सावंतवाडी पोलीस वाहतूक शाखेचे हेड कॉन्स्टेबल विद्येश सापळे, पोलीस नाईक सखाराम भोई, जिल्हा वाहतूक शाखेचे हेड कॉन्स्टेबल दीपक दळवी यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.

Related Stories

लोटेतील 33 उद्योगांना नोटीस

Patil_p

सीमेवरील रॅपीड टेस्टनंतरही होम क्वारंटाईन बंधनकारक

NIKHIL_N

बांबूत गरिबांचे अर्थमान सुधारण्याची ताकद

NIKHIL_N

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी ‘मिशन वात्सल्य’

NIKHIL_N

साखरतर-म्हामूरवाडी खाडीत होडी बुडाली, 11 बुडाले 3 जणांचा मृत्यू

Archana Banage

निकृष्ट दर्जाचे झेंडे इन्सुली ग्रामपंचायतीकडून परत

Anuja Kudatarkar