Tarun Bharat

बंद टपऱ्यांमध्ये मटका जोमात

गौरी आवळे / सातारा :

शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेजीत सुरू असलेला मटका व्यवसाय म्हणजे पोलीसांची धास्ती हाय का नाय असाच प्रश्न उपस्थित करणारी स्थिती पहायला मिळते. यात आकडय़ांचा खेळ हा फक्त कागदावर न राहता तो चालु-बंद टपऱ्यांवर झळकवला जात आहे. यामुळे पोलीसांच्या पोकळ कारवाईचा मटका व्यवसायिकांवर फारसा परिणाम दिसत नाही.

सातारा शहर व शाहूपुरी भागात अनेक किरकोळ व्यवसाय करण्याच्या हेतूने टपऱ्या थाटल्या जातात. या टपऱ्यावर भाजीविक्री, खाद्य पदार्थ विक्री असे छोटे व्यवसाय करण्यात येतात. परत काही कारणास्त या टपऱ्या बंद होवून जागीच उभ्या राहतात. यामुळे या बंद टपऱ्याचे वाढते अतिक्रमण सातारा नगरपालिकेला दिसत नाही. तर पोलीसही याकडे नेहमीच दुर्लक्ष करताना दिसतात. याचा फायदा मात्र अवैधरित्या व्यवसाय करणारे मटका व्यवसायिक गेल्या अनेक वर्षापासून घेत आहेत. बंद टपरी ही पुढून उघडण्यापेक्षा मागून उघडून दररोज आकडय़ाचा खेळ खेळला जात आहे. या खेळाचा कोण विजेता यांची माहिती त्याच व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी या आकडय़ाच्या पाटय़ा खुलेआम टपऱ्यांवर झळकवल्या जात आहेत. हे आकडे कशाचे असा प्रश्न नागरिकांना नेहमीच पडत असतो. पोलीसांनाही या आकडय़ाची चांगलीच ओळख असते. तरीही कारवाई करण्याची तयार नेहमीच दाखवली जात नाही. ही बाब मटका व्यवसायिकांच्या चांगली पचनी पडली आहे. यामुळे कारवाईची धास्ती राहिली नसून हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढवण्यात भर दिला जात आहे.

हीच का ती मटक्याची ठिकाणे…

शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका कोणत्या ठिकाणी सुरू असतो. असा प्रश्न पडण्याची गरज भासत नाही. पोलीसांना मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पोवईनाका, एसटी स्टॅड, गेंडामाळनाका, आयटीआय रोड, गुरूवार परज, कमानी हौद, राजवाडा, मंगळवार तळे, भाजी मंडईच्या खाली पार्किग, जनावरांच्या दवाखान्यामागील पार्किग येथे मटका तेजीत सुरू असतो.

Related Stories

भामटय़ाकडून चोरीच्या 27 दुचाकी हस्तगत

Patil_p

सातारचे नवे पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल

Archana Banage

जिल्हय़ात तीन ठिकाणी जुगार अड्डय़ावर छापा

Patil_p

सातारा-कोल्हापूर महामार्ग यापुढे महापुरात बुडणार नाही

Patil_p

वीर धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग वाढला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Archana Banage

सातारा : उपनगराध्यक्ष किशोर शिंदेंनी दिला राजीनामा

Archana Banage