म्हैसूर : मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला आहे. परंतु कोरोनामुळे यंदा अत्यंत साधेपणाने बकरी ईद सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे दरवर्षी बकरी ईदच्या निमित्ताने होणाऱया शेळय़ा व मेंढय़ांच्या विक्रीला यंदा अल्प प्रतिसाद असल्याने मेंढपाळांच्या चिंतेत वाढ झाली आहे. म्हैसूर येथील विविध ठिकाणी बाजारपेठेत मेंढपाळांनी विक्रीसाठी मेंढय़ा आणल्या असून अत्यंत अल्प प्रमाणात ग्राहकांकडून खरेदी होत असल्याचे पहायला मिळत आहे.


previous post