Tarun Bharat

बजरंग पुनियाचा युके व्हिसा मंजूर

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचा आंतरराष्ट्रीय मल्ल बजरंग पुनियाला आगामी बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेसाठी व्हिसा मंजूर करण्यात आला.  या स्पर्धेपूर्वी तो सरावासाठी अमेरिकेला जाणार होता. पण व्हिसा समस्येमुळे त्याच्या सराव सत्राबद्दल अनिश्चितता निर्माण झाली होती. भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाने केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्या सहकार्याने बजरंग पुनियाला अखेर व्हिसा मिळवून दिला असून यामुळे तो आता प्रवासाचे नियोजन करु शकेल.

28 वर्षीय बजरंग पुनियाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने कांस्य मिळविले होते. गेल्याच महिन्यात तो अमेरिकेतील मिशेगन विद्यापीठात सरावासाठी जाणार होता. पण ब्रिटनकडून व्हिसा मिळण्यास विलंब झाल्याने त्याचे जाणे लांबले होते. बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. बजरंग पुनियाने 2018 राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते.

पुनिया चालू आठवडाअखेरीस अमेरिकेला रवाना होईल. 30 जुलैपर्यंत त्याचे सराव प्रशिक्षण शिबिर चालू राहील. या शिबिरात बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया सहभागी होणार असून अमेरिकेतून ते बर्मिंगहममध्ये दाखल होतील. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा झाल्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा व अन्य काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी क्रीडा मंत्रालयातर्फे 111 खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारातील सराव प्रशिक्षणासाठी विदेशात पाठविण्यात आले असून हा सर्व खर्च क्रीडा मंत्रालयाने केला आहे.

Related Stories

मुंबईची पुन्हा हाराकिरी, सर्वबाद 194

Patil_p

सुनील चेत्रीचे पुनरागमन, भारतीय संघ दोहास रवाना

Patil_p

अनिर्णीत सामन्यात जडेजाचे सलग दुसरे अर्धशतक

Amit Kulkarni

….तर विश्वचषक टी-20 स्पर्धेचे आकर्षण संपेल : इमाम उल हक

Patil_p

पीव्ही सिंधू, समीर वर्मा उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

जेसन रॉय इंग्लंड वनडे संघात

Patil_p
error: Content is protected !!