Tarun Bharat

बजरंग पुनिया, रवि दाहिया अंतिम फेरीत

आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप

वृत्तसंस्था/ अल्माटी

बजरंग पुनिया व रवि कुमार दाहिया या भारतीय मल्लांनी येथे सुरू असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये आपापल्या वजन गटातून अंतिम फेरी गाठली आहे. याशिवाय नरसिंग पंचम यादव (74 किलो गट), सत्यवर्त कादियन (97 किलो) यांनीही पदकाच्या फेरीत स्थान मिळविले आहे. उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने त्यांची कांस्यपदकाची लढत होणार आहे.

बजरंगला 65 किलो वजन गटाची अंतिम फेरी गाठताना फारसे कष्ट पडले नाहीत. त्याने कोरियाच्या याँगसेऑक जेआँगवर सहज मात केली. प्रतिआक्रमणात बजरंगने जेआँगला खाली घेत पहिला गुण घेतला आणि प्रतिस्पर्ध्याने हालचाली न केल्याने बजरंगला आणखी एक गुण मिळाला. त्यानंतर उपांत्य फेरीत मंगोलियाच्या बिलगुन सरमांदाखचा पराभव करून बजरंगने अंतिम फेरी गाठली. जेतेपदासाठी जपानच्या ताकुतो ओटोगुरोशी त्याची लढत होणार आहे. 2018 मध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तसेच गेल्या वर्षीच्या आशियाई चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत बजरंगला ओटोगुरोकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याची परतफेड करण्याची संधी बजरंगला मिळाली आहे.

5ाdन7 किलो गटाच्या लढतीत एक वर्षानंतर पुनरागमन केलेल्या रवि दाहियाने शानदार प्रदर्शन करीत उज्बेकच्या नॉडिरजॉन सफारोव्हवर 9-2 अशा गुणांनी विजय मिळविला. त्याची पुढील लढत पॅलेस्टाईनच्या अली एम एम अबुरुमैलाशी झाली आणि त्यात तांत्रिक सरसतेवर रविने विजय मिळविला. जेतेपदासाठी त्याची लढत इराणच्या अलीरेझा नुसरतुल्लाह सरलाकशी होणार आहे.

सत्यवर्त कादियनने 97 किलो गटात उपांत्यपूर्व फेरी गाठताना किर्गीझस्तानच्या अर्सलनबेक तुर्दुबेकोव्हचा 8-0 असा एकतर्फी धुव्वा उडविला. पहिल्या सत्रातच त्याने दोन गुण मिळविले आणि उर्वरित गुण त्याला खाली घेत मिळविले. तुर्दुबेकोव्हने त्याला फारसा प्रतिकारच केला नाही. उपांत्यपूर्व फेरीत सत्यवर्तने उझ्बेकच्या मुखम्मदरसुल रखिमोव्हवर 4-1 अशा गुणांनी विजय मिळविला. पण उपांत्य फेरीत इराणच्या अली खलिल शबनीबेनगरकडून तांत्रिकतेच्या आधारे केवळ 25 सेकंदात पराभव स्वीकारावा लागला. करणने 70 किलो गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठताना इराणच्या अमिरहुसेन अली हुसैनीवर 3-1 अशी मात केली. पण पुढील फेरीत त्याला कझाकच्या सीरबाझ तलगतकडून 0-6 असा पराभव स्वीकारावा लागला.

Related Stories

चमिंडा वासचा 3 दिवसातच प्रशिक्षकपदाचा राजीनामा

Patil_p

पंतप्रधानांनी साधला पॅराऍथलेट्सशी सुसंवाद

Amit Kulkarni

दुसऱया कसोटीत भारताची विजयाकडे वाटचाल

Patil_p

स्पेन-पोलंड लढत गोलबरोबरीत

Patil_p

इंग्लंडला हरवून विंडीजची विजयी सलामी

Patil_p

एकही चेंडू खेळण्यापूर्वी विराटच्या खात्यावर असाही विश्वविक्रम

Patil_p