मुंबई : बजाज कंपनीची इलेक्ट्रीक चेतक स्कुटर खरेदी करणाऱयांना आता आणखी थोडा कालावधी वाट पाहावी लागणार आहे. कोरोनामुळे या गाडीच्या बाजारात येण्याला उशीर होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जवळपास 14 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर रेट्रो इलेक्ट्रीक स्कुटर लाँच करणाऱया बजाज ऑटोवर सध्या कोरोनाचे संकट घोंघावते आहे. इतक्या वर्षानंतर लाँच केलेल्या नव्या इलेक्ट्रिक दुचाकीबाबत ग्राहकांमध्ये उत्सुकता होती. पण कोरोनामुळे कंपनीला अडचणी येत आहेत. विक्रीसाठी ही गाडी उपलब्ध करण्यासाठी कंपनीला आणखी काही कालावधी लागणार आहे. 1 लाख रुपये किमतीच्या या गाडीचे पुणे व बेंगळूर शहरात लाँचिंग करण्यात आले आणि तेथे ग्राहाकांनी या गाडीचे स्वागतही केले. पण इतर शहरात ही गाडी उपलब्ध करण्यात न आल्याने ग्राहक या गाडीची आतुरतेने वाट पाहात आहेत. कोरोनामुळे कारखाना बंद असल्याने उत्पादन होऊ शकलेले नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.


previous post
next post