Tarun Bharat

बजेट 2020 : एलआयसीमधील भागीदारी केंद्र सरकार विकणार

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या एलआयसीमधील आपली भागीदारी केंद्र सरकार विकणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली.

सीतारामन म्हणाल्या, एलआयसीमधील आपली भागीदारी विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसा प्रस्तावही केंद्र सरकारने ठेवला आहे. त्यासाठी एलआयसीबाबत समितीने केलेल्या शिफारसी सरकारने स्वीकारल्या आहेत. एलआयसीमधील आपली किती भागीदारी विकणार हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

एलआयसीबरोबरच सरकारचे नियंत्रण असलेल्या आयडीबीआय बँकेतील भागीदारीसुद्धा विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्र सरकार एलआयसीतील भागीदारी विकणार असल्याने एलआयसीचा आयपीए लवकरच बाजारात विक्रीसाठी आणण्यात येणार आहे. 2019-20 या आर्थिक वर्षांत विक्रीमधून 1 लाख 05 हजार कोटी रुपये जमवण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे.

Related Stories

विदेशी अर्थसाहाय्य – संस्थांना दिलासा नाहीच

Patil_p

लसीच्या भीतीने ग्रामस्थांची ‘शरयू’त उडी

Patil_p

कोरोनाची दुसरी लाट! SBI कडून 71 कोटींची मदत

Rohan_P

‘सप’वर भाजपचा काउंटर अटॅक

Patil_p

यूपी : 9 रेल्वे स्टेशनसह धार्मिक स्थळांवर बॉम्ब हल्ल्याची धमकी

datta jadhav

एम्समध्ये आता चाचण्या होणार मोफत

Patil_p
error: Content is protected !!