Tarun Bharat

बझारमधुन महिला ग्राहकाचे सापडलेले सोन्याचे घंटण

कर्मचारी संतोष जाधव यांचा प्रामाणिकपणा

वारणानगर / प्रतिनिधी

येथील वारणा बझारमध्ये महिला ग्राहकाचे सापडलेले तीन तोळ्यांचे सोन्याचे घंटण कर्मचारी संतोष जाधव यांनी प्रामाणिकपणे परत केले. यामुळे सुमारे दिड लाखांचा ऐवज परत मिळाल्याने समाधानची प्रतिक्रिया महिलेने व्यक्त केली.

सहकारमहर्षि पुरस्कार प्राप्त वारणा बझार नेहमीच ग्राहकांच्या सेवेकरिता तत्पर असतो . वारणा बझारचे निर्भेळ वस्तू , रास्त भाव , उत्तम सेवा व व्यवहारातील पारदर्शकता यामुळे बाजारातील आपली विश्वासार्हता स्थापनेपासून कायम ठेवली आहे . वारणा बझारमधील सेवकांच्या प्रामाणिकपणाचे वेळोवेळी दर्शन घडत असते .
नवे पारगांव येथील महिला ग्राहक सौ . स्नेहल प्रविण शिंदे या वारणा बझारच्या वारणानगर येथील शाखेत खरेदीसाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांचे तीन तोळयाचे सोन्याचे घंटण हरविले.वारणा बझारचे वॉचमन संतोष बाबासो जाधव यांना ते घंटण सापडले. त्यानी सरव्यवस्थापक शरद महाजन यांच्याकडे तात्काळ सुपुर्द केले. त्यानंतर ते घंटण हरविल्याचे लक्षात आल्यानंतर ती महिला बझारमध्ये येताच श्री. महाजन यांनी महिला ग्राहकास परत केले. त्यावेळी सौ.स्नेहल शिंदे यांनी संस्थेचे ऋण व्यक्त करुन आभार मानले व संतोष जाधव यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
शरद महाजन यांनी वॉचमन संतोष जाधव यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केले . सोन्याचे घंटण परत करतेवेळी सरव्यवस्थापक शरद महाजन , सेल्स मॅनेजर महेश आवटी, चिफ अर्कोटंट संदिप पाटील, दिलीप पाटील, तानाजी ढेरे व ग्राहक उपस्थित होते.

Related Stories

मुलांवरील लसीचे परीक्षण रोखण्यास नकार

Patil_p

घरी राहुन दसऱ्याचा आनंद लुटा : छ. शाहू महाराज

Archana Banage

साऊंड सिस्टीम लावल्याचा कारणातून तरुणाचा भोसकून खून

Archana Banage

“मला २५०० कोटींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर”; भाजपच्या माजी मंत्र्याचे वक्तव्य

Archana Banage

भारत-पाक सामना देशहित आणि राष्ट्रधर्माविरुद्ध

datta jadhav

खासगी रुग्णालयांनी आयसीयू, कोरोना बेडची संख्या वाढवावी : मंत्री मुश्रीफ

Archana Banage