Tarun Bharat

बडतर्फीच्या कारवाईने एसटी कर्मचाऱयांमध्ये संताप

एकतर्फी कारवाई होत असल्याचा आरोप

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी विभागाकडून संपावर असलेल्या 30 कर्मचाऱयांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आह़े या प्रकाराने संपकरी एसटी कर्मचाऱयांमधून संताप व्यक्त करण्यात येत आह़े एसटी महामंडळाकडून होणारी कारवाई एकतर्फी असून कर्मचाऱयांचे म्हणणे एकून घेतले जात नाह़ी त्यामुळे एसटीचा संप हा दुखवटा असल्याचे एसटी कर्मचारी मानत आहेत, असे संपकरी एसटी कर्मचाऱयांनी ‘तरूण भारत’जळव बोलताना सांगितल़े

 रत्नागिरी एसटी विभागातील संपावर असलेल्या 330 कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले होत़े या कर्मचाऱयांना कामावर हजर राहण्यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आली होत़ी दरम्यान या कर्मचाऱयांनी नोटीसांना उत्तर दिले नसल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नियमानुसार बडतर्फीची कारवाई करण्यात येत असल्याचे रत्नागिरी विभागाकडून सांगण्यात आले तसेच उर्वरित कर्मचाऱयांनी तत्काळ कामावर हजर रहावे, असेही आवाहन करण्यात आले आह़े

   एसटीच्या एकूण 400 फेऱया सोडल्या

रविवारी रत्नागिरी विभागातील 750 कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत़ तर  रत्नागिरी विभागातून एसटीच्या एकूण 400 फेऱया सोडण्यात आल्य़ा यात तब्बल 20 हजाराहून अधिक प्रवाशांची एसटीच्या सेवेचा लाभ घेतल़ा रत्नागिरी विभागात एसटीचे प्रशासन, कार्यशाळा, यांत्रिकी, चालक-वाहक असे मिळून 3 हजार 679 कर्मचारी आहेत़ एसटी विलिनीकरणाच्या मुद्यावर हे सर्व कर्मचारी संपावर गेले होत़े  मात्र आता महिन्यानंतर एसटीचे कर्मचारी कामावर परतू लागले आहेत़

  हजर झालेल्या कर्मचाऱयांमध्ये प्रशासकीय 257, कार्यशाळा 202, चालक 74, वाहक 72, चालक तथा वाहक 37 असे 642 कर्मचाऱयांचा समावेश आह़े  एसटी कर्मचारी कामावर हजर होत असल्याने रत्नागिरी विभागातून गाडय़ा सोडण्यासही सुरूवात झाली आह़े शुक्रवारी जिह्याच्या विविध आगारातून 400 फेऱया सोडण्यात आल्य़ा या फेऱयांनाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आह़े मंगळवारी 20 हजार प्रवाशांची एसटीच्या फेऱयांचा लाभ घेतल़ा

Related Stories

एका चुकीमुळे हॉटेल व्यावसायिकाने गमावले तब्बल एक लाख रुपये

Anuja Kudatarkar

माडखोल भराडीदेवीचा आज वार्षिक जत्रोत्सव

Anuja Kudatarkar

किंजलघर येथे दरड कोसळली; तीन घरांना धोका

Archana Banage

राजापूर-मोसम रेल्वे ट्रकवर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

Patil_p

दांडेआडोममध्ये होणार अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प

Patil_p

दापोलीतील पंचायत समिती आरक्षण सोडत रद्द

Archana Banage