Tarun Bharat

बडतर्फ एसटी कर्मचाऱयांची संख्या 134 वर!

Advertisements

चिपळुणातील 5 कर्मचाऱयांचा  समावेश

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिह्यामध्ये संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱयांविरूद्ध बडतर्फीची कारवाई शुक्रवारीही सुरूच होत़ी शुक्रवारी चिपळूण आगारातील 5 कर्मचारी बडतर्फ करण्यात आल़े  यामुळे जिह्यातील एकूण बडतर्फ कर्मचाऱयांची संख्या 134 झाली आह़े पुढील दिवसात आणखी काही कर्मचारी बडतर्फ करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी वाहतूक विभागाकडून देण्यात आली.

 एसटीचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे, यासाठी मागील 2 महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत़ या संदर्भात 330 एसटी कर्मचाऱयांना शासनाकडून निलंबित करण्यात आले होत़े या निलंबित कर्मचाऱयांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश परिवहन विभागाकडून रत्नागिरी विभागाला प्राप्त झाले होत़े त्यानुसार बडतर्फीची कारवाई प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आह़े

 शुक्रवारी एसटीच्या 400 हून अधिक फेऱया सोडण्यात रत्नागिरी विभागाला यश आल़े एसटीचे तब्बल 170 चालक-वाहक कामावर हजर झाल्याचे एसटीकडून सांगण्यात आले. रत्नागिरी आगारातूनही 4 फेऱया सोडण्यात आल्य़ा प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद या फेऱयांना लाभत आह़े

 जिह्यात आता एकूण 700 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत़ रत्नागिरीत कर्मचारी कामावर हजर होत असले तरी अधिकाधिक चालक-वाहक कामावर हजर रहावेत, यासाठी एसटीच्या अधिकाऱयांकडून प्रयत्न सुरू आहेत़

Related Stories

पाचल मंडळ कार्यालयाच्या इमारतीची दुर्दशा

Abhijeet Shinde

पाचवी, सातवीच्या शिष्यवृती निकालाचाही सावळा गोंधळ

Patil_p

नेमळे भीषण अपघातात कारमधील दोघे ठार

Ganeshprasad Gogate

तीन नेपाळी कामगारांचा मृत्यू

Patil_p

भाजी विक्रेत्यांची आरोग्य तपासणी

NIKHIL_N

दापोलीत रस्त्यांची दुरवस्था, मनसेच्यावतीने रस्त्यात रोप लावणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!