Tarun Bharat

बडाल अंकलगीची पुनरावृत्ती टळली

केवळ दैव बलवत्तर म्हणून आठजण बचावले : अगसगे येथील घटना : भिंतीखाली अडकले साहित्य

वार्ताहर /अगसगे

गेल्या आठवडाभरापासून सुरू झालेल्या दमदार पावसाने अगसगे येथील एक घर कोसळले. सुदैवानेच घरातील मंडळी वेळेत बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेमध्ये केवळ दैव बलवत्तर म्हणूनच मोठी दुर्घटना टळली. सुदैवानेच आठजण बचावले.

येथील कलमेश्वर गल्लीतील बसू कल्लाप्पा कडोलकर आणि बाळू कल्लाप्पा कडोलकर यांच्या घराची भिंत रविवारी रात्री अचानक ढासळू लागली. या आवाजामुळे बाळू कडोलकर याने घरातील लोकांना आरडाओरड करून बाहेर जाण्यास भाग पाडले. रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

घरातील सर्वजण बाहेर पडल्यानंतर बघता बघता घराच्या भिंती कोसळल्या. घरातील जीवनावश्यक वस्तू आणि साहित्य भिंतीच्या ढिगाऱयाखाली अडकले. या दोन्ही कुटुंबातील काहीजण झोपी जाण्याच्या तयारीत असतानाच ही घटना घडली. आणखी काही वेळानंतर ही घटना घडली असती तर बडाल अंकलगीची पुनरावृत्ती झाली असती.

कलमेश्वर गल्लीतील हे घर कौलारू असून गरीब कुटुंब असल्यामुळे आपल्या परिस्थितीनुसार त्यांनी हे घर बांधले होते. यातच शेतवाडीतील पाणी या घरामध्ये शिरत होते. यामुळे घराच्या भिंती खचल्या होत्या. शनिवारीच या घराची एक भिंत कोसळली होती. मात्र, घर मजबूत आहे, असे समजून ते त्याच घरात राहात होते. परिस्थितीमुळे त्यांना याच घराचा आधार घ्यावा लागला होता.

या घटनेची माहिती मिळताच सोमवारी सकाळी तहसीलदार आर. के. कुलकर्णी, महसूल निरीक्षक सतीश बिचगत्ती, पीडीओ वीणा हडपद, तलाठी राणी पाटील व ग्राम पंचायत सदस्यांनी पाहणी करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

आता उघडय़ावरच संसार

कडोलकर कुटुंबाचे हे घर कोसळल्याने त्यांचा संसार उघडय़ावर पडला आहे. कोणताच आधार नसल्यामुळे पुढे काय करायचे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. बाळू आणि बसू हे गवंडी व प्लम्बिंगचे काम करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. या गरीब कुटुंबावर ही गंभीर परिस्थिती ओढवली आहे. त्यांना तातडीने आर्थिक व जीवनावश्यक वस्तूंची मदत करणे गरजेचे आहे.

Related Stories

राजहंसगड परिसरातील गवत जळून खाक

Patil_p

शेतकऱयांचे हित जपत पीकहानीचा सर्व्हे करा

Patil_p

राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Amit Kulkarni

17 जानेवारीला हुतात्मा दिन गांभिर्याने पाळा

Patil_p

अशोक नायगावकर, महेश केळुस्कर रसिकांच्या भेटीला

Amit Kulkarni

बळ्ळारी नाल्यापर्यंतच्या ‘त्या’ कालव्याचे काम मजुरांकडूनच

Amit Kulkarni