Tarun Bharat

बदलत्या जगानुसार विद्यार्थ्यांना घडवावे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : शिक्षक दिन कार्यक्रमात पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी /पणजी

आज जग झपाटय़ाने बदलत आहे. शिक्षकांनीही बदलत्या जगाला अनुसरून   विद्यार्थ्यांना घडवावे. एखाद्या मुलाला घडविण्यासाठी आईवडिलांबरोबरच शिक्षकांचाही मोठा वाटा असतो. म्हणूनच विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी आपल्या शिक्षकांप्रती त्याच्या मनात कायम आदर असतो, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. 

येथील इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात काल सोमवारी सरकारतर्फे आयोजित केलेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शिक्षण खात्याचे संचालक भुषण सावईकर, एस.ई.आर.टी.चे नागराज होन्नेकरी व इतर मान्यवर उपस्थित होते.

गोवा शिक्षण सुविधांत ‘नंबर वन’

शिक्षण क्षेत्रासाठी लागणाऱया साधनसुविधा चांगल्यापैकी उपलब्ध करून देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. केवळ सरकारी शाळा, हायस्कूलांतच नव्हे, तर अनुदानीत शाळांतही साधन सुविधा पुरविल्या आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महामारीने सर्वांनाच शिकविले

जीवनात नवनवीन गोष्टी घडत असतात, त्यांना समोरे जाण्यासाठी आज प्रत्येकाने तयार राहिले पाहिजे. गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोविड महासंकटात सरकारचेही डोळे उघडले आहेत. कोविडसारखे महासंकट येणार याची कल्पनाही नव्हती. मात्र ते आल्यानंतर त्याला सामोरे जावे लागले. शिक्षकांनाही या संकटाला समोरे जावे लागले. शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणपध्दती आत्मसात केली. काही दुर्गम भागात नेटवर्क मिळत नव्हते अशा ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जात होते. पुरस्कार प्राप्त व इतर सर्व शिक्षकांचे आपण अभिनंदन करतो. सर्वस्तरावरील विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण मिळावे म्हणून ‘दिष्टावो’ हा चॅनल सुरु केला. त्याच्या माध्यामातूनही विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शिक्षक दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध विभागांतील दहा शिक्षकांना मान्यवरांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्मृती चिन्ह, प्रशस्तीपत्रक, रोख रक्कम व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्राथमिक शिक्षक विभाग पुरस्कार

पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये प्राथमिक शिक्षक विभागात दिलीप तुकोजी म्हामल (सरकारी प्राथमिक विद्यालय पार्से-पेडणे), विवेकानंद कृष्णा प्रभुगावकर (सरकारी प्राथमिक विद्यालय मालीम पैगिणी काणकोण)

माध्यमिक शिक्षक विभाग

माध्यमिक शिक्षक विभागात विद्या कृष्णा म्हाळशेकर (सरकारी माध्यमिक विद्यालय वाळपई सत्तरी), अविनाश दत्ताराम विर्नोडकर (बालभारती विद्यामंदीर, रायबंदर-तिसवाडी) महादेव हनुमंत शिंदे (गुजराथी समाज विशेष विद्यालय आके मडगाव), इल्बा बॅरता नोरोन्हा (सरकारी माध्यमिक विद्यालय बाळ्ळी केपे)

माध्यमिक मुख्याध्यापक

माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक विभागात विलास रामनाथ सतरकर (डॉ. केशव बळिराम हेडगेवार माध्यमिक विद्यालय कुजिरा बांबोळी, तिसवाडी)

उच्च माध्यमिक शिक्षक

उच्च माध्यमिक विद्यालय विभागात चंद्रलेखा दामोदर मेस्त्री (एस. एस. आंगले उच्च माध्यमिक विद्यालय माशे काणकोण)

उच्च माध्यमिक मुख्याध्यापक

उच्च माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक विभागात रुपा संजय प्रभू खोपे (वसंतराव धेंपो उच्च माध्यमिक विद्यालय कला, विज्ञान आणि वाणिज्य कुजिरा बांबोळी तिसवाडी) यांचा समावेश आहे.

शिक्षण खात्याचे संचालक भुषण सावईकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर समई प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्र्यासह इतर मान्यवरांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहिली.

Related Stories

गोवा, दिल्लीचे वीजमंत्री आज आमने-सामने

Amit Kulkarni

नागरिकांची बैठक रद्द नव्हे, लांबणीवर

Omkar B

न्यायालयाच्या मान्यतेचा सल्ला पंचायतमंत्र्यांनी फेटाळला

Amit Kulkarni

पाणीपुरवठा खात्याच्या अभियंत्याला घेराव

Amit Kulkarni

‘जुगाड’ करून बसची व्यवस्था करतो

Omkar B

पेडणेत मगो नेते प्रवीण आर्लेकर यांचा प्रचाराचा शुभारंभ

Amit Kulkarni