बेंगळूर : आगामी निवडणूक देखील बदामी विधानसभा मतदारसंघातूनच लढवणार असल्याची घोषणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. बागलकोट जिल्हय़ाच्या बदामी मतदारसंघातील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी बेंगळूर येथे सिद्धरामय्या यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आगामी निवडणूकही बदामीतूनच लढवावी, अशी विनंती सिद्धरामय्यांकडे केली. यावेळी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना सिद्धरामय्या यांनी, आपले असंख्य चाहते बदामी मतदारसंघातून पुढील निवडणूक लढविण्याची विनंती करीत आहेत. त्यामुळे आपण याच मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहे. कोणताही निर्णय तुमच्या सल्ल्यानेच घेईन, असे सांगितले. मागील निवडणुकीवेळी बदामीत उमेदवारी अर्ज दाखल करून केवळ एकच दिवस प्रचार केला होता. तरी देखील येथील जनतेने स्वाभिमानाने आपल्याला निवडून दिले, असे ते म्हणाले.


previous post