Tarun Bharat

बदाम खीर

साहित्य : 1 वाटी बदाम, पाव वाटी अथवा चवीनुसार गूळ, अडीच वाटी दूध, 3 वेलची, सजावटीसाठीः 1 चमचा बदामचे छोटे तुकडे, 1 चमचा काजू तुकडे, 1 चमचा पिस्त्याचे पातळ काप, 1 केशरकाडी

कृती : प्रथम बदाम कोमट पाण्यात अर्धा तास भिजत ठेवावेत. नंतर गार पाण्यात घालून सोलून घ्यावेत. आता सोललेली वेलची, त्याची साल आणि बदाम मिक्सर जारमध्ये घालावे. त्यातच थोडेसे दूध घालून त्याची पातळ पेस्ट बनवून घ्यावी. चमचाभर कोमट दुधात केशरकाडी भिजत घालावी. आता गॅसच्या मंद आचेवर पातेल्यात दूध गरम करण्यास ठेवावे. त्यातच गूळ टाकावे. गूळ विरघळेपर्यंत एकसारखे ढवळत राहावे. मिश्रणाला उकळी आली आणि दूध आटले की त्यात बदाम पेस्ट घालून मिश्रण पुन्हा एकदा ढवळत राहावे. पाच मिनिटांनी आच बंद करावी. तयार खीर बाऊलमध्ये काढावी. वरून बदाम, काजू, पिस्ता आणि केशरकाडीने सजवून खीर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवावी. नंतर खाण्यास द्या.

टीप : वेलचीची साल घातल्यास त्याला एक फ्लेवर येतो. खीर बनविण्यासाठी साखर वापरू शकता.

Related Stories

पौष्टिक आणि चविष्ट नाश्त्यासाठी बनवा ओट्स आप्पे

Kalyani Amanagi

चविष्ट आणि सर्वात पौष्टिक असणारा अळिवाचा लाडू

Kalyani Amanagi

चटपटीत ऑलिव्ह सॅलड

Amit Kulkarni

गोल्डन पॉकेट्स

Omkar B

व्हेज बॉल्स

tarunbharat

केशर-बदाम लस्सी

tarunbharat
error: Content is protected !!