Tarun Bharat

बनावट नोटांसह गावठी कट्टा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने वेशांतर करून तिघांच्या मुसक्या आवळल्या

प्रतिनिधी/ कराड

कराड तालुक्यातील कोळेवाडी येथे 94 हजार 500 रूपयांच्या बनावट नोटांसह गावटी कट्टा हस्तगत करत स्थानिक गुन्हे शाखेने तिघांच्या मुसक्या आवळल्या. वेशांतर करत दबा धरून बसलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या कारवाईने खळबळ उडाली. संशयितांकडून बनावट नोटांसह कट्टा हस्तगत केला असून त्यांच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. 

  पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना तीन संशयित कोळेवाडी (ता. कराड) येथील वीज वितरणच्या  स्टेशनजवळ  येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्याजवळ भारतीय चलनातील दोन हजार व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आहेत, अशी खबर होती. याबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी कोळेवाडी येथे गुरूवारी दुपारी साध्या वेशात सापळा रचला होता. 

  पोलीस उशिरापर्यंत दबा धरून बसले होते. त्यावेळी तीन संशयित तेथे आले.  त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना हटकले. पोलिसांना पाहून ते इसम पळून जाऊ लागले. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता तीनही इसमांकडे 2000 रुपये व 500 रुपयांच्या 94,500 रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. एका इसमाच्या पॅन्टच्या कंबरेस एक देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले. तिघाही संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे. साहाय्यक निरीक्षक आनंदसिंग साबळे, हवालदार अतिष घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, अमित सपकाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, मयुर देशमुख, पंकज बेसके, विजय सावंत यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Related Stories

शिवसेनेच्या शहर प्रमुखांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Patil_p

विधान परिषद : कोल्हापुरात सतेज पाटील-महाडिक गट आमने-सामने

Abhijeet Khandekar

सातारा पोलिसांची कामगिरी चांगली

Patil_p

Accident : देवदर्शनाहून परतताना भीषण अपघातात पाच जण जागीच ठार

Abhijeet Khandekar

एल्गार परिषद : उच्च न्यायालयाने ज्योती जगताप यांना जामीन नाकारला

Abhijeet Khandekar

महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाकडून नवरात्रौत्सवासाठी नियमावली जाहीर

Tousif Mujawar