Tarun Bharat

बनावट वैमानिकांमुळे पाकिस्तानवर ओढवली नामुष्की

32 युरोपीय देशांकडून बंदीची तयारी : इम्रान सरकारकडून 34 वैमानिक बडतर्फ : परवाना प्रक्रियाच निघाली बनावट

वृत्तसंस्था /  ब्रसेल्स, इस्लामाबाद

पाकिस्तानच्या वैमानिकांवर त्वरित बंदी घाला, अशी सूचना युरोपीय युनियन सेफ्टी एजेन्सीने (ईएएसए) स्वतःच्या 32 सदस्य देशांना केली आहे. पाकिस्तानात वैमनिकांच्या परवान्याशी निगडित मोठा घोटाळा समोर आला आहे. आम्ही कुठल्याही प्रकारची जोखीम पत्करू शकत नसल्याने या वैमानिकांच्या कार्यावर त्वरित बंदी घातली जावी असे सुरक्षा यंत्रणेने म्हटले आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या नागरीउड्डाण मंत्रालयाने पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या 34 वैमानिकांना बडतर्फ केले आहे. यात दोन महिला वैमानिकांचाही समावेश आहे.

पाकिस्तानी वैमानिकांच्या एका मोठय़ा समुहाकडे बनावट परवाना (सुमारे 40 टक्के) असल्याचे उघड झाले आहे. हा परवाना पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणानेच दिला असल्याने चिंतेची बाब आहे. पाकिस्तानकडून परवानाप्राप्त वैमानिकांवर त्वरित बंदी घालणे आता गरजेचे ठरले आहे. पाकिस्तानी वैमानिक कार्यरत असल्यास त्याची माहिती त्वरित द्या, अशी सूचना ईएएसएने सदस्य देशांना लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

34 वैमानिक बडतर्फ

पाकिस्तानने 34 वैमानिकांच्या परवान्याची चौकशी पूर्ण केल्यावर त्यांना बडतर्फ केले आहे. या सर्वांचे परवाना संशयास्पद आढळून आले आहेत. नोकरीवरून हटविण्यात आलेल्या वैमानिकांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. हे प्रकरण समोर आल्यावर आमची प्रतिष्ठाच धोक्यात आल्याचे पाक नागरी उड्डाण मंत्रालयाने म्हटले आहे.

6 देशांकडून बंदी

कुवेत, इराण, जॉर्डन, संयुक्त अरब अमिरात यासारख्या देशांनी पीआयए आणि पाकिस्तानी वैमानिकांवर यापूर्वीच बंदी घातली आहे. व्हिएतनाम आणि ब्रिटननेही अशाचप्रकारचा निर्णय घेतला आहे. आता या यादीत मलेशियाही सामील झाला आहे.

घोटाळय़ाचे स्वरुप

22 मे रोजी कराची येथे पीआयएचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. 23 जून रोजी याचा चौकशी अहवाल संसदेत मांडण्यात आला होता. वैमानिकाच्या चुकीमुळे दुर्घटना घडली आहे. वैमानिक कोरोनावर चर्चा करण्यात व्यस्त होते, असे नागरी उड्डाण मंत्र्यांनी संसदेत सांगितले होते. पीआयएमध्ये 860 वैमानिक असून यातील 262 जणांनी परवाना बनावट मार्गाने मिळविल्याचा संशय व्यक्त होत आहे. या वैमानिकांवर बंदी घालण्यात आली आहे. दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असलेल्या पीआयएच्या अडचणी आता वाढतच चालल्या आहेत.

Related Stories

क्रोएशियात भीषण भूकंप, मोठे नुकसान, 7 जण ठार

Omkar B

गृहयुद्धाच्या जखमा विसरतोय सीरिया

Patil_p

कोरोना लसीवरून गुप्तचर यंत्रणांमध्येही संघर्ष

Patil_p

WHO कडून ‘मंकिपॉक्स’चे नामांतर; ‘हे’ असेल नवे नाव

datta jadhav

नवजातांना चुकून देण्यात आली कोरोनाची लस

Patil_p

अफगाणमध्ये स्फोटात 30 दहशतवाद्यांचा मृत्यू

Patil_p